Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPS 95: खाजगी नोकरीतील निवृत्त पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर वारसाला पेन्शन कशी मिळेल? जाणून घ्या

EPS 95 EPFO

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employment Provident Fund Organisation-EPFO) अंतर्गत खाते असणाऱ्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळण्याची सुविधा आहे. पण त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यांना ही पेन्शन कशी मिळेल, याबाबत जाणून घेऊया.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employment Provident Fund Organisation-EPFO) अंतर्गत खाते असणाऱ्या खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेला किंवा योजनेला EPS-95 या नावाने ओळखले जाते. देशात या योजनेचे 75 लाख पेन्शनधारक लाभार्थी आहेत. खाजगी क्षेत्रातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या पेन्शनची सुविधा दिली जाते. मात्र या पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास  कुटुंबाला पेन्शन मिळते का? असा प्रश्न उपस्थित राहतो तर याचे उत्तर हो असे आहे. पेन्शन ऑफिसच्या कार्यालयात रितसर अर्ज करून मृत व्यक्तीच्यी कुटुंबातील सदस्य या पेन्शनचा लाभ घेऊ शकतात.

अर्ज करण्याची पद्धत

खाजगी संस्थेत काम करून निवृत्त झालेल्या पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यांना पेन्शनचा लाभ घेता येतो. पण यासाठी पेन्शनधारकाच्या वारसांना ईफएफओकडे रीतसर अर्ज दाखल करून, काही कागदपत्रे जमा करावी लागतात.  

आवश्यक कागदपत्रे

  • पेन्शनधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र
  • लाभार्थ्यांच्या आधार कार्डची प्रत
  • लाभार्थ्यांचे बँक खाते तपशील
  • बँकेच्या पासबुकची मुख्य प्रत आणि कॅन्सल चेक
  • वारस अल्पवयीन असल्यास वयाचा पुरावा

कर्मचाऱ्याच्या पगारातून EPFO दरमहा ठराविक रक्कम कापत असते. पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ती व्यक्ती हयात असताना त्याचे ईपीएफओकडे खाते असणे गरजेचे आहे.

पेन्शन धारकाच्या मृत्यूनंतर मुलांना  मिळणारे फायदे  

  • वारसदार व्यक्तीला पेन्शन म्हणून मिळणारी ही रक्कम निवृत्तीवेतन म्हणून देण्यात येणाऱ्या रकमेच्या 75% इतकी असते. 
  • पेन्शनधारकाच्या वारसदाराला प्रत्येक महिन्याला 750 रुपये वयाच्या 25 वर्षापर्यंत पेन्शन दिली जाते. 
  • वारसदाराला अपंगत्वाचा त्रास असल्यास, त्याला आजीवन पेन्शन दिली जाते.

वारस किंवा पालकांना मिळणारा लाभ

EPS-95 या योजनेत नमूद केल्यानुसार  पेन्शन धारकाच्या मृत्यूनंतर पालकांना किंवा वारसाला आजीवन ही पेन्शन मिळते. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर आई-वडील किंवा पत्नीला संपूर्ण आयुष्य ही पेन्शन मिळते.

Source: www.zeebiz.com