PMVVY Scheme: केंद्र सरकारने 2017 मध्ये एक विशेष पेन्शन योजना सुरू केली होती, ज्यामध्ये विवाहित जोडप्यांना मोठा लाभ मिळतो आहे.जर तुम्हीही विवाहित असाल आणि उतारवयात पेन्शन मिळविण्याचा विचार करत असाल तर घाई करा. या योजनेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च ही आहे.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार विवाहित जोडप्याला 51 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या सरकारी योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री वय वंदना योजना (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana), ज्यामध्ये तुम्हाला वृद्धापकाळात पेन्शनचा लाभही मिळेल.
Table of contents [Show]
31 मार्चपर्यंत मुदत
सदर योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर 31 मार्च 2023 पर्यंतच तुम्हीअर्ज करू शकता हे लक्षात ठेवा. या योजनेत पती-पत्नी दोघांनाही फायदा होणार आहे हे विशेष. लग्न झालेल्या जोडप्यांना म्हातारपणात पेन्शन मिळण्याचा मार्ग या योजनेद्वारे खुला होणार आहे.
'प्रधानमंत्री वय वंदना योजना' पिछले 5 वर्षों से बुजुर्गों को सशक्त बना रही है।
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) July 21, 2022
21 जुलाई, 2017 को लॉन्च की गई इस योजना के माध्यम से एकमुश्त निवेश करके कोई भी बुजुर्ग व्यक्ति मासिक या वार्षिक पेंशन का लाभ उठा सकता है। pic.twitter.com/hIP4vTPWth
काय आहे ही योजना?
प्रधानमंत्री वय वंदना योजना ही केंद्र सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे, ज्या अंतर्गत अर्जदाराला वार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. भारत सरकारने ही योजना 2017 साली आणली होती. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे चालवली जाते. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक या योजनेसाठी पात्र आहेत.
PMVVY योजनेअंतर्गत, ज्येष्ठ नागरिक एकरकमी रक्कम गुंतवू शकतात आणि 10 वर्षांच्या कालावधीसाठी हमी पेन्शन मिळवू शकतात. गुंतवणूकदाराच्या पसंतीनुसार पेन्शन मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक मिळू शकते.
योजनेअंतर्गत विवाहित जोडपे किमान गुंतवणूक रक्कम रु. 1.5 लाख आणि गुंतवणुकीची कमाल मर्यादा रु. 15 लाख इतकी आहे.या योजनेअंतर्गत पेन्शनचे दर सरकारद्वारे निश्चित केले जातात आणि वेळोवेळी त्यांचे पुनरावलोकन केले जाते. या योजनेअंतर्गत सध्याचा व्याजदर वार्षिक 7.4% इतका आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मिळेल मोठा फायदा
PMVVY योजना ज्येष्ठ नागरिकांना अनेक फायदे देते, ज्यात हमी परतावा, नियमित उत्पन्न प्रवाह आणि पॉलिसी मुदतीदरम्यान गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित (नॉमिनी) व्यक्तीला आर्थिक लाभ यांचा समावेश आहे. या योजनेला जीएसटीमधूनही सूट देण्यात आली आहे.
PMVVY योजनेचा लॉक-इन कालावधी 10 वर्षांचा आहे, याचा अर्थ गुंतवणूकदार या कालावधीत गुंतवणूकीची रक्कम काढू शकत नाही. परंतु, स्वत:च्या किंवा जोडीदाराच्या गंभीर आजाराच्या प्रसंगी, योग्य ती कागदपत्रे सादर करून गुंतवणूकदार पॉलिसी मुदतीपूर्वी सरेंडर करू शकतो आणि जमा झालेली रक्कम काढू शकतो.
जोडप्यांनी एकत्र बचत केली तर अधिक फायदा
जर पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर दोघांना या खात्यात अधिक पैसे जमा करावे लागतील. अधिक बचत म्हणजे अधिक लाभ हे तत्व तर आपण सगळे जाणतोच. आजघडीला व्याजदर वार्षिक 7.4% इतका आहे. तेव्हा जर जोडप्याने मिळून एका ठराविक कालावधीसाठी 10 लाख रुपये जमा केले असतील तर त्यांना त्यावर वार्षिक 74000 इतकी पेन्शन मिळेल.
दर महिन्याला पेन्शन घेण्याचा विचार जर करत असाल तर महिन्याला सुमारे 6100 रुपये जोडप्याला मिळू शकतात.
लक्षात असू द्या की भारतात ज्येष्ठ नागरिकांना इतरांच्या तुलनेत अधिक व्याजदर दिले जातात. तेव्हा वेळीच जर बचतीला सुरुवात केली तर म्हातारपणात मोठी बचत आणि पेन्शन मिळवण्याचे मार्ग खुले होऊ शकतात.