EPFO Pension Scheme : ईपीएफओने कर्मचारी पेन्शन योजनेबाबत अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS अंतर्गत वाढीव पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे. ईपीएफओने ही मुदत तीन महिन्यांनी म्हणजेच 26 जूनपर्यंत वाढवली आहे.
Table of contents [Show]
26 मे पर्यंत मुदतवाढ
सर्वोच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2022 च्या आदेशानुसार, EPFO ने निवृत्तीवेतनधारक आणि सदस्यांकडून उच्च निवृत्तीवेतनासाठी अर्ज करण्याची व्यवस्था केली होती. याअंतर्गत 12 लाख अर्ज EPFO ला प्राप्त झाले आहेत. याआधी अर्ज करण्याची ऑनलाइन मुदत केवळ 3 मे पर्यंत होती. मात्र अधिकाधिक लोकांना या सेवेचा लाभ घेता यावा, म्हणून 26 मे 2023 पर्यंत मुदत वाढविण्यात आली.
काय आहे प्रकरण
कर्मचारी सेवानिवृत्ती निधी संस्थेच्या (EPFO) अनेक प्रतिनिधींनी ही मुदत वाढविण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. EPFO ने कर्मचारी निवृत्तीवेतन योजना (EPS) अंतर्गत वाढीव निवृत्ती वेतनासाठी एकत्रितपणे अर्ज करण्यासाठी सदस्य आणि त्यांचे नियोक्ते (Employers) सक्षम करण्यासाठी एक प्रक्रिया आणली होती. 22 ऑगस्ट 2014 च्या EPS दुरूस्तीने निवृत्ती वेतनयोग्य वेतन मर्यादा 6,500 प्रति महिना वरून 15,000 प्रति महिना केली होती. तसेच, सदस्य आणि त्यांच्या नियोक्त्यांना त्यांच्या वास्तविक पगाराच्या 8.33 टक्के EPS मध्ये योगदान देण्याची परवानगी होती. नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी निवृत्ती वेतन (सुधारणा) योजना 2014 वर शिक्कामोर्तब केले होते.
कसा करावा अर्ज
ईपीएफओने यासंदर्भात त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांना एक परिपत्रक जारी केले आहे. ईपीएफओने सांगितले होते की, URL (Uniform Resource Locator) संदर्भात सार्वजनिकरित्या सर्वांना माहिती पोहचवू शकेल, अशी सुविधा केली जाणार आहे. या अंतर्गत प्रत्येक अर्जाची नोंदणी करून त्याची डिजिटल पद्धतीने नोंद केली जाईल आणि त्याला पावती क्रमांक दिला जाईल. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे प्रभारी प्रत्येक संयुक्त पर्याय प्रकरणाचे पुनरावलोकन करतील. त्यानंतर, अर्जदाराला ई-मेल/पोस्ट आणि त्यानंतर एसएमएसद्वारे निर्णयाची माहिती दिली जाईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे
कर्मचारी आणि नियोक्ता यांना EPFO कडे संयुक्त घोषणापत्र सादर करावे लागेल. यामध्ये त्यांना अधिक पेन्शनचा पर्याय वापरायचा आहे, असे सांगावे लागेल. त्यानंतर नियोक्त्याने या घोषणेला मान्यता देणे आवश्यक ठरते. यासाठी EPFO ने आपल्या वेबसाइटवर एक लिंक सक्रिय केली आहे. त्या लिंकवर क्लिक करुन EPFO चे अधिकारी आपला फॉर्म तपासतील. त्या फॉर्म मध्ये काही त्रुटी आढळल्यास मालक आणि कर्मचारी यांना त्याची माहिती दिली जाईल. ऑनलाइन अर्ज भरताना तुम्हाला सर्व माहिती अचूक भरावी लागेल.