Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Onion MahaBank : कांदा साठवणुकीसाठी राज्य सरकार उभारणार कांद्याची महाबँक; कांदा चाळींसाठी वाढीव निधीची तरतूद

कांद्याचे भाव स्थिर राहात नाहीत. मात्र शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध नसल्याने कांद्याची आवक वाढल्यानंतर कमी किंमतीत कांदा विकण्याशिवाय पर्याय उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्य शासनाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षेतखाली सुकाणू समिती स्थापन केली आहे. त्या समितीच्या मार्गदर्शनानुसार राज्यात कांद्याची महाबँक (Onion Mahabank) ही संकल्पनाही राबवली जाणार आहे.

Read More

Onion Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 15 ऑगस्टपूर्वी मिळणार अनुदानाची रक्कम; सरकारची घोषणा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदान प्राप्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कांदा अनुदानाची (Onion Subsidy) रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात तारीख देण्यात आली आहे. त्यानुसार 15ऑगस्टपर्यंत सर्व पात्र शेतकर्‍यांना कांदा अनुदानाची रक्कम प्राप्त होणार आहे.

Read More

Onion Economy In Lasalgaon: लासलगावचा कांदा शेतकऱ्यांना रडवतोय! सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फटका

Onion Economy In Lasalgaon: सलग दुसऱ्या वर्षी कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने इथला कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पुढल्या हंगामात कांद्याची शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.यासंदर्भात नुकताच महामनीच्या टीमने थेट लासलगावमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कांद्याचे अर्थकारण जाणून घेतले.

Read More

Onion Subsidy: कांदा अनुदान मिळवण्यासाठी 'असा' करू शकता अर्ज

Onion Subsidy: कांद्याचे दर कमी झाल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आले होते. त्यांची परिस्थिती लक्षात घेता सरकारने त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल असे अनुदान देण्यात येणार आहे.

Read More

Maharashtra Onion Crisis : कांदा शेतकऱ्याला का रडवतोय?

Maharashtra Onion Crisis: कांद्याचा भाव पडल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालंय. अलीकडेच वाहतुकीचाही खर्च निघत नाही म्हणून एका शेतकऱ्याला 70 गोणी कांदा उकिरड्यावर फेकून द्यावा लागला. शेतकऱ्यांना परवडेल असा दर मिळत नाहीए. आणि वर निर्यातही थांबवीय. कांद्याच्या बाबतीत नेमकं काय घडतंय?

Read More

Mulching Paper मुळे वाढतंय कांद्याचं उत्पादन, शेतकऱ्यांना होतोय फायदा

Mulching Paper: शेतकऱ्याला मल्चिंग पेपर वापरण्यासाठी एकरी 15,000 रुपये खर्च येतो, याउलट तण काढणी, औषध फवारणी इ. गोष्टीवर जास्त खर्च होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीसाठी मल्चिंग पेपरकडे कल वाढला आहे.

Read More