Mulching Paper: हल्ली शेती करताना पारंपरिक तंत्रज्ञानाला मागे टाकत नवीन तंत्रज्ञान(Modern Farming) विकसित करणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चामध्ये जास्त नफा मिळू शकतो. कांद्याची शेती(Onion Planting) करण्यासाठी बरेच शेतकरी वाफा पद्धतीचा वापर करतात व त्यातून उत्पादन घेतात. मात्र या पारंपरिक पद्धतीला मागे टाकून गेल्या काही वर्षात मल्चिंग पेपरवर(Mulching Paper) कांद्याची लागवड केली जातीये आणि विशेष म्हणजे वाफा पद्धतीपेक्षा शेतकऱ्यांना मल्चिंग पेपरवर कांद्याची लागवड केल्याने जास्त नफा मिळतोय. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
एकरी 15,000 रुपये मल्चिंग पेपरचा खर्च
प्रमुख्याने मल्चिंग पेपर(Mulching Paper) हा वेगेवेगळ्या पिकांसाठी वापरला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून कांदा लागवडीसाठी(Onion Planting) मल्चिंग पेपर वापरला जाऊ लागला आहे. त्यासाठी विशिष्ट्य होल असणारा मल्चिंग पेपर वेगवेगळ्या जाडीमध्ये(Different Microns) बाजारात उपलब्ध आहे. कांदा हे रब्बी हंगामातील(Rabi Season) प्रमुख पिकांपैकी एक आहे. भारतातील कांद्याचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रातील नाशिक(Nashik) जिल्ह्यात घेतलं जातं. अनेक शेतकरी मल्चिंग तंत्रज्ञानाच्या संभाव्य खर्चाची भीती बाळगतात, परंतु ते राबविण्यासाठी एकरी 15,000 रुपयापर्यंतच खर्च येतो, तर त्याहूनही अधिक खर्च तण काढणे, औषधे फवारणी, खते यावर केला जातो असे मल्चिंग वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हे आहेत मल्चिंग पेपर वापराचे फायदे
वाफा पद्धतीमध्ये दोन कांद्यांमधील अंतर हे एकसमान नसल्याने कांद्याच्या वाढींमध्ये बऱ्याच वेळा अडचण निर्माण होते. याउलट मल्चिंग पेपरवर(Mulching Paper) ठराविक अंतरावर होल्स असल्याने दोन कांद्याच्या रोपांमधील अंतर एकसमान होते, ज्यामुळे कांद्याची वाढ होण्यास मदत होते. याशिवाय मल्चिंग पेपरच्या वरील बाजूस प्रकाश परावर्तित होत असल्याने प्रकाशसंश्लेषणाची(Photosynthesis Process) प्रक्रिया पटकन होण्यास मदत होते व कांदा पटकन मोठा होतो. कांदा पिकासाठी आवश्यक असलेली खते मल्चिंगमुळे वाहून न जाता पिकाला मिळतात ज्यामुळे कांद्याची वाढ होण्यास मदत होते. काढणीच्या वेळी मल्चिंग पेपरमुळे कांदा काढणे सोपे जाते. याशिवाय कांद्याची पाट गाळून न पडल्याने काढणी अधिक सोपी होते. या फायद्यांमुळे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात मल्चिंग पेपरकडे वाढला आहे.