Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gpay, Paytm किंवा PhonePe वरून एका दिवसाला किती पैसे ट्रान्सफर करू शकता? जाणून घेण्यासाठी वाचा

Online Payment

Online Payment App: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI द्वारे एका दिवसात पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

Online Payment App: गेल्या काही वर्षात आपण मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन पेमेंट(Online Payment) वापरण्यास सुरुवात केली आहे. डिजिटलाजेशनचा(Digitalization) हा सर्वात मोठा टप्पा भारतात यशस्वी रित्या पार पाडत आहे. आज प्रत्येकाच्या खिश्यात रोख रकमेपेक्षा मोबाईलमध्ये GPay, Amazon Pay, Paytm आणि Phone Pe सारखे अँप्स पाहायला मिळत आहेत. अगदी छोट्यातील छोट्या आणि मोठ्यातील मोठ्या खर्चासाठी लोक ऑनलाईन पेमेन्टचा(Online payment) वापर करत आहेत. जर तुम्ही देखील UPI द्वारे पेमेंट करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला माहित आहे का? तुम्ही वापरात असलेल्या या ऑनलाईन अँपमधून एका दिवसाला किती पैसे ट्रान्सफर करू शकता? चला तर याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

एका दिवसात इतके पैसे ट्रान्सफर करू शकता

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने(NPCI) UPI द्वारे एका दिवसात पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा निश्चित केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, आता तुम्ही UPI द्वारे एका दिवसात फक्त 1 लाख रुपये ट्रान्सफर(Transfer) करू शकता. याशिवाय, किती रक्कम हस्तांतरित केली जाऊ शकते हे तुमची बँक आणि तुम्ही वापरत असलेले अॅपवर(App) अवलंबून आहे.

GPay

GPay तुम्हाला UPI द्वारे एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत पेमेंट(Payment) करण्याची परवानगी देते. GPay तुम्हाला एका दिवसात 10 पेक्षा जास्त व्यवहार करण्याची परवानगी देत ​​नाही. याचा अर्थ असा की तुम्ही 1 लाख रुपयांचा एक व्यवहार करू शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या रकमेचे फक्त 10 व्यवहार करू शकता.

Paytm

NCPI च्या नवीन नियमानंतर, Paytm तुम्हाला UPI द्वारे एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करण्याची परवानगी देते. याशिवाय यूजर्सवर ऑनलाईन पेमेंटशी(Online Payment) संबंधित इतर कोणतेही बंधन नाही.

PhonePe

PhonePe तुम्हाला एका दिवसात 1 लाख रुपये ट्रान्सफर करू देते. या अॅपच्या वापरकर्त्यांवर इतर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत.

Amazon Pay

Amazon Pay तुम्हाला UPI द्वारे एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत पेमेंट(Payment) करू देते. तथापि, हे अॅप वापरकर्त्यांना एका दिवसात 20 व्यवहार करण्याची परवानगी देते.