UPI Money Limit: Unified Payment Interface (UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. जसे तुम्ही गुगल पे, फोन पे वर पैशांचा वापर करता, तसेच युपीआयव्दारे पैशांचा व्यवहार करणारे अनेक ग्राहक आहेत. ग्राहकांनो तुम्हाला माहिती का? या ॲपव्दारे कितीपर्यंत पैशांचा व्यवहार करू शकता, याबाबत जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
UPI व्दारे एका दिवसात किती पैसे काढू शकता
युपीआयव्दारे पैशाच्या व्यवहारावर आता लिमिट आणली आहे, ही मर्यादा एनसीपीआयनं आणली आहे. एनसीपीआयव्दारे मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक एका दिवसात फक्च UPI व्दारे 1 लाखाचे पेमेंट करू शकतात. यापेक्षा अधिक पैशांचे व्यवहार करता येणार नाही. मोठी रक्कमचा व्यवहार करणाऱ्यावर आता बाधा आली आहे.
GPay (गुगल पे)
जर तुम्ही पैशांचा व्यवहार Google pay (जीपे) द्वारे करत असाल, तर तुम्ही एका दिवसाला एक लाखांपर्यंतचा व्यवहार करू शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला, तरी त्याची मर्यादा 1 लाखच असणार आहे.
Paytm (पेटीएम)
एनसीपीआय नुसार या Paytm व्दारेदेखील तुम्ही 1 लाखांपर्यंत व्यवहार करू शकता. पेटीएमव्दारे तुम्ही एका तासाला फक्त 20 हजार रुपये पाठवण्याची परवानगी आहे. एका तासात तुम्ही 5 ट्रान्झॅक्शन्स व जास्तीत जास्त 20 व्यवहार करू शकता.
PhonePe / Amazon Pay (फोन पे व अमेझॉन पे)
फोन पे आणि अमेझॉन पे हे ग्राहकांना दिवसाला 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करण्याची परवानगी देते. तर फोन पे मध्ये किती व्यवहार करायचा हे त्या बँक खात्यावर अवलंबून असते. तसेच अमेझॉन पे वर तुम्ही नोंदणी केल्यानंतर पहिल्या चोवीस तासांत केवळ 5 हजार रुपये तुम्ही ट्रान्सफर करू शकता.