Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pandharpur Wari 2023: विठुरायाच्या भक्तांसाठी एसटीही सेवेत! राज्यभर धावणार विशेष गाड्या, पथकरातून सूट

Pandharpur Wari 2023: लाडक्या पांडुरंगाच्या भक्तांसाठी, वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटीदेखील आता सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी जवळ येत आहे, तसा वारकऱ्यांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांना लागली आहे. एसटी महामंडळानंदेखील या सोहळ्यासाठी आपली सेवा देण्याचं ठरवलं आहे.

Read More

MSRTC @75: मोफत प्रवासाची सोय होती म्हणून शिकल्या डोंगरदऱ्यातील विद्यार्थिनी…

डोंगर दऱ्यात, रानावनात राहणाऱ्या विद्यार्थिनींना मात्र शहरांत शिकण्यासाठी जायचं ठरल्यास खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यांचे पालक देखील सुरक्षिततेचं कारण देत मुलींचे शिक्षण बंद करतात. गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात शाळाबाह्य विद्यार्थिनींचे प्रमाण वाढले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचे शाळा गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी 2018 साली महाराष्ट्र सरकारने ही योजना अंमलात आणली.

Read More

MSRTC@75Years : एसटी स्थानकांचं रुपडं पालटणार, अमृत महोत्सवानिमित्त काय खास?

MSRTC@75Years : सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बस स्थानकांचं रूप आता पालटणार आहे. गावोगावी पोहोचलेली एसटी सर्वच बाबतीत आता नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. यंदा एसटी आपलं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करीत आहे. त्यानिमित्त या वृ्त्तात एसटी बसस्थानकांची स्थिती आणि होणारे बदल याचा आढावा घेऊ...

Read More

MSRTC @75Years : एसटी महामंडळाच्या मोफत आणि सवलतीच्या दरातील सर्व योजना जाणून घ्या एका क्लिकवर...

ST Corporation Services and Offerings: एसटी महामंडळातर्फे जवळपास 30 प्रकारच्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात ज्यात सवलतीच्या दरात आणि मोफत प्रवासाची सुविधा काही विशेष नागरिकांना देण्यात येते. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर आजच नजीकच्या एसटी महामंडळाच्या संबंधित विभाग नियंत्रकाच्या कार्यालयाला भेट द्या.

Read More

एसटी महामंडळाची 30 रुपयांत नाष्टा देणारी योजना रद्द, प्रवाशांची होतेय लुटमार!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 8 जुलै 2016 रोजी प्रसिध्द केलेल्या निवेदनात या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली होती. गेले काही दिवस सोशल मिडीयावर या योजनेची माहिती देणारे पत्र चांगलेच व्हायरल झाले होते. या योजनेनुसार महामंडळाच्या अधिकृत थांब्यांवर केवळ 30 रुपयांत नाष्टा आणि चहा प्रवाशांना खरेदी करता येत होता.

Read More