Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Go First Airlines ची उड्डाणे 25 जुलै पर्यंत रद्द, आर्थिक अडचणीवर मार्ग निघेना!

जेव्हापासून कंपनीच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु झाली आहे, तेव्हापासून कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील वेळेवर पगार दिलेले नाहीत. या अडचणींचा सामना करत असलेल्या एअरलाइन्सने अनेकांना कामावरून काढून टाकले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या प्रवाशांना पुरेशी सेवा देण्यासाठी देखील कंपनीकडे मनुष्यबळ नाहीये. त्यामुळे कंपनीने 25 जुलैपर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

Read More

Go First एअरलाइन्सची विमाने पुन्हा आकाशात झेपावणार? 425 कोटी रुपये कर्ज देण्यास बँका तयार

गो फर्स्ट एअरलाइन्सची सेवा जुलै महिन्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जदारांनी एअरलाइन्सला 425 कोटी रुपये कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, याआधी DGCA कडून विमान कंपनीचे ऑडिट केले जाणार आहे. मे महिन्यापासून गो फर्स्टची विमाने पार्किंगमध्ये धूळ खात पडली आहेत. आर्थिक चणचणीमुळे कंपनीने आपली सेवा बंद केली होती.

Read More

Go First Crisis: गो फर्स्ट एअरलाईन्सचं ग्रहण सुटेना, 22 जूनपर्यंत उड्डाणे रद्द!

3 मे पासून एका पाठोपाठ एक सगळी उड्डाणे कंपनीने बंद केलेली आहेत. पायलट आणि इतर स्टाफचा पगार देखील कंपनीला देता येत नाहीये. अशातच गो फर्स्ट एअरलाइन्सने त्यांची उड्डाण सेवा 22 जून 2023 पर्यंत ठप्प राहणार असल्याची माहिती दिली आहे.

Read More

Go First Airline: 'गो फर्स्ट'पुढे नवं संकट! पायलट्स आणि 'केबिन क्रू'चे राजीनामे रोखण्यासाठी कंपनीची बोनसची ऑफर

Go First Airline: गो फर्स्टने याच महिन्याच्या सुरुवातीला 2 मे 2023 रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दिवाळखोरीची याचिका दाखल केली होती. कंपनीची विमान सेवा तात्पुरती खंडीत करण्यात आली आहे. मात्र आर्थिक संकट दूर झाले आणि नादुरुस्त इंजिनाऐवजी नवीन इंजिन्स मिळाली तर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सेवा पुन्हा सुरु होईल, असा आशावाद गो फर्स्टच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

Read More

Go First Crises: 'गो फर्स्ट'ची दिवाळखोरीची याचिका अखेर राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दाखल

Go First Crises:वाडिया ग्रुपच्या 'गो फर्स्ट' या विमान कंपनीने सादर केलेली दिवाळखोरीची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (NCLT) दाखल करुन घेतली आहे. लवादाने अभिलाष लाल यांची इंटरिम रिझोल्युशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती केली आहे. 'गो फर्स्ट'वर 6521 कोटींचे कर्ज आहे. आर्थिक चणचण असल्याने कंपनीने 19 मे 2023 पर्यंत विमान सेवा खंडीत केली आहे.

Read More