Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचे महाकाय बजेट! यंदा 50 हजार कोटींचा टप्पा ओलांडणार

BMC Budget 2023

BMC Budget 2023: मुंबई महानगर पालिका ही देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबई महापालिकेचे बजेट येत्या 4 फेब्रुवारी रोजी सादर केले जाणार आहे.

देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेचे बजेट (Brihanmumbai Municipal Corporation - BMC) येत्या 4 फेब्रुवारी 2023 रोजी सादर केले जाणार आहे. वर्ष 2022 मध्ये मुंबई महापालिकेत तब्बल 45949 कोटींचे बजेट सादर करण्यात आले होते. यंदा बजेटचा आकडा 50000 कोटींवर जाण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. (BMC Budget 2023 may cross 50000 crore mark)

सध्या मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 4 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई महापालिकेत प्रशासक इक्बाल सिंह चहल बजेट सादर करणार आहेत. गेल्या वर्षी 45000 कोटींचा बजेट सादर करण्यात आला होता. त्यात 17.70% वाढ झाली होती. यंदा त्यात 5 ते 7% वाढ होण्याची शक्यता आहे. बीएमसीचे बजेट यंदा 50000 कोटींच्या आसपास असेल असा अंदाज ज्येष्ठ पत्रकार विष्णु सोनावणे यांनी व्यक्त केला.

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे या शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता शिक्षण समितीचा अर्थसंकल्प प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना सादर करतील. महापालिकेचे बजेट अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू सादर करतील. (BMC Budget will be table on 4th Feb 2023) 

मुंबईत मेट्रो, कोस्टल रोडसारखे महत्वकांक्षी पायाभूत प्रकल्प सुरु आहेत. गेल्या वर्षी बजेटमधील 3200 कोटी हे कोस्टल रोड प्रकल्पांसाठी देण्यात आले होते. गेल्या वर्षी शिक्षणाचे बजेट 14.45% ने वाढवण्यात आले होते. पालिकेचे 500 चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ केला होता.महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या भांडवली खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता विष्णू सोनावणे यांनी व्यक्त केली.

आठ राज्यांपेक्षाही मोठे आहे मुंबई महापालिकेचे बजेट (BMC Budget was more than the budgets of eight State Governments)

वर्ष 2022-23 साठीचा महापालिकेचा बजेट हा 45949 कोटींचा होता. त्याआधीच्या वर्षात 2021-22 मध्ये पालिकेच्या बजेटचा आकार 39038.83 कोटी इतका होता. विशेष मुंबई महापालिकेचे बजेट हे देशातील आठ राज्यांच्या बजेटपेक्षा मोठे आहे. त्रिपुरा, नागालॅंड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, सिक्कीम आणि गोवा या राज्यांच्या तुलनेत मुंबई महापालिकेचे बजेट मोठे आहे.