Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BMC Budget 2023: महापालिका आरोग्य, पायाभूत सोयीसुविधा आणि डिजिटल शिक्षणावर भर देणार

MCGM BMC Budget 2023

Image Source : www.twitter.com

BMC Budget 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प शनिवारी (दि.4 फेब्रुवारी) सादर केला जाणार आहे. हा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या मुख्यालयात सादर केला जाणार आहे. यावेळी सुमारे 38 वर्षांनंतर प्रथमच महापालिकेचे प्रशासक अर्थसंकल्प सादर करून तो मंजूर ही करणार आहेत.

BMC Budget 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प शनिवारी (दि.4 फेब्रुवारी) सादर केला जाणार आहे. यावेळचा हा अर्थसंकल्प कोणत्याही पक्षाचा असणार नाही. काही महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. पण प्रशासकाच्या नेमणुकीतून राज्य सरकार मुंबई महापालिकेवर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावेळच्या मुंबईच्या अर्थसंकल्पात आरोग्य, पायाभूत सोयीसुविधा आणि डिजिटल शिक्षणावर भर दिला जाण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, जानेवारी महिन्यात 19 तारखेला पंतप्रधानांनी मुंबईत येऊन मुंबईतील अनेक पायाभूत सोयीसुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. या विकासकामांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याचा मोठा सहभाग होता. मुंबईचा चेहरा-मोहरा बदलून लोकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रोच्या माध्यमातून राज्य सरकारने पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पांचे उद्घाटन करून जणू काही आगामी निवडणुकांची रंगीत तालीम केली होती. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प शनिवारी (दि.4 फेब्रुवारी) सादर केला जाणार आहे. हा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या मुख्यालयात सादर केला जाणार आहे. यावेळी सुमारे 38 वर्षांनंतर प्रथमच महापालिकेचे प्रशासक अर्थसंकल्प सादर करून तो मंजूर ही करणार आहेत. महापालिकेची मुदत गेल्यावर्षी मार्च 2022 मध्ये संपली असून सरकारने पालिकेवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. प्रशासक म्हणून इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) हे कारभार पाहत आहेत. गेल्यावर्षी पालिकेचा अर्थसंकल्प 45,949 कोटींचा होता. तो यावेळी 50,000 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

पायाभूत सोयीसुविधा आणि आरोग्यासाठी भरीव तरतूद

महापालिकेकडून यावेळच्या अर्थसंकल्पात पायाभूत सोयीसुविधा आणि आरोग्यासाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीची, कोविड-19ची परिस्थिती लक्षात घेऊन पालिकेकडून आरोग्य केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. यासाठी बीएमसीकडून आरोग् विभागाच्या बजेटमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता आहे.

शिक्षणासाठी भरीव तरतूद असू शकते

मुंबई महापालिकेने यापूर्वीच आयसीएसई, सीबीएसई तसेच आंतरराष्ट्रीय आणि केंब्रिज बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षा पालिकेने डिजिटल शिक्षणासह एकूणच पालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावरण्यासाठी सुमारे 3,300 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. यावर्षीही पालिकेकडून शिक्षण विभागासाठी भरघोस तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प (BMC Education Budget 2023) अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे शनिवारी दि. 4 फेब्रुवारी सकाळी महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंग चहल यांना सादर करतील. तर पालिकेचा मुख्य अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू हे सादर करतील.