Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जाणून घ्या, कर्जमुक्त व्यक्तींच्या 10 सवयी!

Debt-Free Life

Debt-Free Life: कर्जमुक्त जीवन जगण्यासाठी, तुमच्या मनाचा ताबा पैशांवर आणि पैशांचा ताबा तुमच्या बॅंक खात्याऐवजी, मनावर ठेवायला शिका, तुम्ही नक्कीच कर्जमुक्त जीवनातून मोकळे व्हाल.

भरमसाठ कर्जाच्या बोज्याखाली दबून जगणं खूप अवघड असतं. ते जगणं तितकंच तणावपूर्वक असतं. कोणतीही गोष्टी आनंदाने करता येत नाही. सतत कर्ज (Debt) फेडण्याची चिंता लागून असते. कर्जाचा एखादा ईएमआय (EMI) चुकला तर संपूर्ण महिन्याचं बजेट कोलमडून जातं. पण यातून बाहेर पडण्याचे मार्गसुद्धा आहेत. जसे की, महिन्याचं बजेट कसं बनवायचं, अधिकृतरीत्या हिडन चार्जेस (Hidden Charges) कसे टाळायचे, हे तुम्ही शिकू शकता. श्रीमंत लोक कशाप्रकारे पैसे वाचवतात यातून तुम्हालासुद्धा तुमच्यापरीने पैसे वाचवण्याची आयडिया मिळू शकेल. या अशा स्मार्ट सवयींचा (Smart Habits) अवलंब करून तुम्ही कर्जमुक्त (Debt-Free Life), चिंतामुक्त आणि आनंदी जीवन जगू शकता. 

कर्जमुक्त जीवन जगण्यासाठी साध्या-सोप्या सवयी!

गोल सेट करा! (Set Goals)

प्रत्येक प्लॅनिंगमागे एक कारण असते; आणि त्या कारणाची पूर्तता करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. म्हणून पैसे वाचवायचे म्हणजे काय करायचे? यात अडकून राहण्यापेक्षा पैसे वाचवून त्या बदल्यात तुम्हाला कोणती गोष्ट पूर्ण करायची आहे, हे निश्चित करा आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करा. म्हणजे ती गोष्ट पूर्ण करण्यास तुम्हाला सबळ कारण मिळेल.

Simple tips to live a debt free life

खरेदी करण्याची घाई टाळा (Wait to buy)

जर तुम्हाला खर्च करण्याचा मोह आवरता येत नसेल, तर तुम्ही वस्तू विकत घेण्यासाठी काही दिवसांची वाट पाहा, ही एक चांगली सवय आहे. या सवयीमुळे तुम्हाला तिच वस्तू कमी किमतीत मिळू शकेल किंवा तुम्हाला त्याची गरजच नाही, याची जाणीव होईल. जेव्हा तुम्ही टीव्ही, मोबाईल किंवा एखादी गाडी विकत घेण्याचा विचार कराल, त्यावेळी तुम्हाला याची अधिक गरज वाटू शकेल. ही सवय तुम्ही दैनंदिन खरेदीसाठी सुद्धा लागू करू शकता.

ऑटो पे बंद करा (Turn off Auto Pay)

तुम्ही जर शॉपिंग साईटवरून वारंवार खरेदी करत असाल तर त्यावरील ऑटो-पे किंवा ऑटो-फिलिंग (auto-pay or auto-fill) हे पर्याय बंद करा. त्याऐवजी ‘आता खरेदी करा’ (Pay Now), हा पर्याय ठेवा. यामुळे तुम्हाला प्रत्येक वस्तू खरेदी करण्यापूर्वी यासाठी किती पैसे खर्च करत आहोत, याची जाणीव असते. आणि त्या वस्तुची सध्या इतकी गरज आहे का? याचा विचार करण्यासाठी वेळ मिळतो. 

क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डप्रमाणे वापरा! (Use Credit Card as Debit Card)

CREDIT CARD

सरप्राईज गिफ्ट किंवा पार्टीज मनाला आनंद देणाऱ्या ठरू शकतात. पण सरप्राईज बिलांमुळे तुमचं महिन्याचं बजेट कोलमडू शकतं. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर (Used of Credit Card) हा डेबिट कार्डसारखा करा. अनावश्यक खर्चामुळे तुमच्या महिन्याच्या बजेटवर ताण येणार नाही; याची काळजी घ्या. उदाहरणार्थ तुम्ही हॉटेलमध्ये जेवणासाठी 1 हजार रुपये आणि बाईकच्या पेट्रोलसाठी 500 रुपये क्रेडिट कार्डमधून खर्च केले. तर लगेच त्याच रात्री क्रेडिट कार्डच्या बिलाचे पैसे त्या खात्यात वळते करण्याची सवय लावून घ्या. यामुळे तुम्हाला तुमच्याजवळ जेवढे पैसे आहेत; तेवढेच खर्च करण्याची सवय राहते. यामुळे उधारीची सवय लागत नाही. जी नेहमी टाळली पाहिजे.

बिलं शिल्लक ठेवू नका (Don’t Carry Pending Bills)

जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असता तेव्हा तुम्ही कोणतीही बिलं शिलल्क (Pending Credit Card Bills) राहणार नाहीत, याची कटाक्षाने काळजी घ्या. कारण क्रेडिट कार्डवरील शिल्लक बिलांवर चक्रवाढ पद्धतीने व्याज (Compounding Interest) आकारले जाते. यामुळे तुमच्यावर मोठा आर्थिक ताण येऊ शकतो. क्रेडिट कार्डच्या खरेदीवर बॅंकेला एकदाही व्याज आकारण्याची संधी देऊ नका. त्यापूर्वीच सर्व बिले भरण्याची सवय लावून घ्या. मग तुम्ही क्रेडिट कार्डचा मनमुराद आनंद घेऊ शकता.   

रोख पैशांत खरेदी करा! (Use Cash)

Rupee

महिन्याची 31 तारीख आली की, हातात क्रेडिट कार्डचे भरमसाठ बिल येते आणि मग हार्टअटॅक येण्याची स्थिती निर्माण होते. हे टाळण्यासाठी काही गोष्टींची रोख पैशांमध्ये खरेदी करण्याची सवय ठेवा. यामुळे विनाकारण खरेदीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कार्ड स्वाईप करण्यापेक्षा रोख रक्कम बाळगणं हे अवघड असतं. यामुळे पैसे खर्च करताना जबाबदारीचं भान राहतं.

सेव्हिंग ऑटोमेट करा (Automate your savings)

प्रत्येक महिन्याला बचतीसाठी पैसे बाजूला काढून ठेवणं अवघड वाटू शकतं. यासाठी बरेच जण ऑटोमेट सेव्हिंगचा (Auto Savings) पर्याय वापरतात. म्हणजे तुमच्या खात्यातून ठराविक तारखेला बचतीची आणि रिटायरमेंटसाठीची रक्कम कापून घेण्याच्या सूचना बॅंकेला द्या. यामुळे तुमच्या लक्षात नसले तरी ती क्रिया बॅंक स्वत:हून करून घेईल.

चांगला दृष्टिकोन ठेवा (Have a Good Attitude)

नवीन युगातील आकर्षणाचा नियम पैशालाही लागू होतो. तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन जितका चांगला असेल, तितकी तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. पैशाचा आनंदाने आणि योग्य पद्धतीने उपभोग घ्या आणि विश्वास ठेवा की, तुम्ही खर्च केलेल्या पैशातून तुम्हाला चांगल्या गोष्टीच मिळणार आहेत. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा पैसै खर्च करता तेव्हा तुम्ही तुमच्याच पैशांना Thank You म्हणा. कारण त्यामुळेच तुम्ही ते खर्च करू शकत आहात आणि त्याचा आनंद घेत आहात.

आपत्कालीन फंड तयार करा (Create Emergency Fund)

emergancy fund

आपत्कालीन निधी (Emergency Fund)चे महत्त्व कोरोनाच्या काळात आपल्या सगळ्यांनाच पटले आहे. कारण याकाळात अनेकांना बचत करून ठेवलेल्या पैशांचाच आधार घेता आला. त्यामुळे इमर्जन्सी फंड ही काळाची गरज आहे. यासाठी किमान तुमच्या 3 ते 6 महिन्यांचा खाण्या-पिण्याचा आणि राहणीमानाचा खर्च भागू शकेल, एवढा आपत्कालीन निधी जमा केला पाहिजे. 

बजेट वाढवू नका (Don’t Boost your Budget)

तुम्हाला एखादी लॉटरी लागो किंवा तुमच्या पगारामध्ये भरमसाठ वाढ होवो, तुम्ही तुमच्या मूळ बजेटवर ठाम राहा. किमान खर्च करण्याचे बजेट पूर्वी होते तसेच ठेवा. त्याऐवजी बचतीचे वेगवेगळे पर्याय शोधा आणि त्यातील गुंतवणूक वाढवा. ते झाल्यानंतर मग खर्च करण्याचे नियोजन करा.

अशा साध्या-सोप्या सवयींमधून तुम्ही कर्जमुक्त जीवन (Debt-free life) जगू शकता. एकदा का तुम्ही कर्जाच्या जाळ्यातून मुक्त झाला की, तुम्ही तुमचे उर्वरित आयुष्य आनंदाने आणि मनमुरादपणे जगू शकता. त्यावेळी तुमच्याकडे तुमच्या मर्जाप्रमाणे खर्च करण्यासाठी पुरेसा पैसासुद्धा असेल.