Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Education Loan: एसबीआयकडून शैक्षणिक कर्ज घेण्याचे काय फायदे आहेत? वाचा

SBI Education Loan

Image Source : https://www.freepik.com/

एसबीआयकडून विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कर्ज योजना राबवल्या जातात. बँकेद्वारे विद्यार्थ्यांना दीड लाख रुपयांपासून ते दीड कोटी रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज दिले जाते.

अनेकांना आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. अशावेळी शैक्षणिक कर्जाचा एक चांगला पर्याय समोर असतो. भारतात अनेक बँका कमी व्याजदर व विविध सुविधांसह शैक्षणिक कर्ज देतात. यापैकीच एक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आहे. तुम्ही देखील शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी SBI कडून कोणत्या शैक्षणिक कर्ज योजना राबवल्या जातात? यासाठीची पात्रता व याचे नक्की फायदे काय आहेत? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. 

एसबीआयच्या शैक्षणिक कर्ज योजना

एसबीआयकडून विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कर्ज योजना राबवल्या जातात. यामध्ये एसबीआय शैक्षणिक कर्ज योजना, स्कॉलर कर्ज योजना, स्किल कर्ज योजना, Global Ed- Vantage, SBI Takeover of Education कर्ज योजना व शौर्य शैक्षणिक कर्ज योजनेचा समावेश आहे.

या योजनांच्या माध्यमातून बँकेद्वारे विद्यार्थ्यांना दीड लाख रुपयांपासून ते दीड कोटी रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज दिले जाते. विद्यार्थी भारतात शिक्षण पूर्ण करणार आहे की परदेशात शिक्षण घेणार आहे, यावरही कर्जाची रक्कम ठरते. या कर्जाचा व्याजदर हा सर्वसाधारणपणे 8.15 टक्के ते 11.75 टक्के एवढा आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी हा 15 वर्षापर्यंतचा असतो.

कर्ज काढताना विद्यार्थ्यांसह पालक देखील सह-अर्जदार असतात. 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही तारण ठेवण्याची गरज नाही. मात्र, त्यापुढील रक्कमेचे कर्ज काढायचे असल्यास तारण ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय, 20 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारले जात नाही. 

एसबीआयकडून शैक्षणिक कर्ज घेण्यासाठीचे नियम

प्रत्येक शैक्षणिक कर्ज योजनेसाठीची पात्रता ही वेगवेगळी आहे. शैक्षणिक कर्ज काढण्यासाठी विद्यार्थी हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. त्याच्याकडे दहावी, बारावी, पदवी व इतर शालेय कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ज्या कॉलेज अथवा विद्यापीठात अ‍ॅडमिशन झाले आहे, त्यासंबंधीत कागदपत्रे असायला हवी. कर्ज घेताना पालकांच्या उत्पन्नासंदर्भातील कागदपत्रे सादर करावी लागतील.

विद्यार्थी या योजनेद्वारे यूजीसी व सरकार मान्य विद्यापीठ व कॉलेजमधून पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करू शकतात. विद्यार्थ्यांना एमसीए, एमबीए, एमएस, टिचर ट्रेनिंगसह इतर पदवी व डिप्लोमा कोर्सचे शिक्षण घेता येईल. 

एसबीआयकडून शैक्षणिक कर्ज घेण्याचे फायदे

कमी व्याजदरकोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना कमी व्याजदर असल्यास फायदा होतो. एसबीआयकडून इतर बँकांच्या तुलनेत खूपच कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध केले जाते. बँकेकडून 8.15 टक्के व्याजदरासह कर्ज उपलब्ध केले जाते.
प्रोसेसिंग शुल्क व तारणकर्ज काढताना बँकेकडून प्रोसेसिंग शुल्काच्या स्वरुपात मोठी रक्कम घेतली जाते. परंतु, एसबीआयकडून 20 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारले जात नाही. याशिवाय, साडेसात लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण ठेवण्याची गरज नसते.
इतर खर्चाचा समावेश या कर्जामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या सर्व खर्चाचा समावेश असतो. प्रवेश शुल्क, लायब्ररी शुल्क, पुस्तक, यूनिफॉर्म व इतर वस्तू, कॉम्प्युटरसह इतर सर्व खर्चाचा समावेश कर्जामध्ये करण्यात आलेला असतो. यामुळे विद्यार्थ्यांना कर्जाच्या रक्कमे व्यतिरिक्त इतर पैसे खर्च करावे लागत नाही.
सोपी प्रक्रियाअनेक बँकामध्ये शैक्षणिक कर्ज काढण्यासाठीची प्रक्रिया खूपच किचकट असते. परंतु, एसबीआयकडून कर्ज घेताना ही प्रक्रिया खूपच जलद व सोप्या पद्धतीने पार पडते. कर्जासाठी जास्त कागदपत्रेही द्यावी लागत नाहीत.