Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Education Loan: शैक्षणिक कर्जाची परतफेड न केल्यास काय परिणाम होऊ शकतात? जाणून घ्या

Education Loan

Image Source : https://www.freepik.com/

शैक्षणिक कर्ज काढणे सोपे असले तरीही त्याची परतफेड करणे मात्र अवघड असते. वेळेवर कर्जाची परतफेड न केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

परदेशात जाऊन उच्च-शिक्षण घेणे सर्वसामान्यांना परवडत नाहीत. पालकांच्या पगारामध्ये शिक्षणाचा खर्च भागवणे शक्य नसते. अशावेळी शैक्षणिक कर्जाचा पर्याय समोर असतो. अनेकजण मालमत्ता तारण ठेवून शैक्षणिक कर्ज काढतात. कर्ज काढणे सोपे असले तरीही त्याची परतफेड करणे मात्र अवघड असते. 

खर्च व बचतीचे योग्य नियोजन न केल्याने कर्जाचे हफ्ते भरण्यात अडचणी येतात व वेळेवर कर्जाची परतफेड न केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तुम्ही देखील शैक्षणिक कर्ज घेतलेले असल्यास त्याची परतफेड करण्यास प्राधान्य द्यायला हवे. या लेखातून शैक्षणिक कर्ज वेळेवर न फेडल्यास कोणती समस्या निर्माण होऊ शकते, याविषयी जाणून घेऊया.

शैक्षणिक कर्जाची परतफेड न केल्यास काय होईल?

विलंब शुल्क आणि अतिरिक्त व्याजशैक्षणिक कर्जाचे काही हफ्ते चुकवल्यानंतर बँकेकडून याबाबत विचारणा केली जाते. तुम्ही जर कर्जाचे हफ्ते उशिरा भरल्यास बँकेकडून यावर विलंब शुल्क आकारले जाते. याशिवाय, हफ्ते भरण्यास जेवढे दिवस विलंब झाला आहे, त्यावर अतिरिक्त व्याजही आकारले जाते. 180 दिवसांपेक्षा अधिक विलंब झाल्यास बँकेकडून इतर कायदेशीर मार्गांचा वापर केला जातो.
क्रेडिट स्कोरवर परिणामशैक्षणिक कर्ज असो अथवा गृहकर्ज, कोणत्याही कर्जाची वेळेवर परतफेड न केल्यास त्याचा सर्वात पहिला परिणाम हा तुमच्या क्रेडिट स्कोरवर दिसून येतो. तुमचा क्रेडिट स्कोर कमी होतो. तसेच, कर्जाचे अनेक हफ्ते न भरल्यास तुम्हाला डिफॉल्टर म्हणूनही घोषित केले जाते. तुमचे नाव CIBIL च्या डिफॉल्टर यादीत समाविष्ट केले जाते.
कर्ज मिळण्यास अडचणीशैक्षणि कर्जाची वेळेवर परतफेड न केल्यास भविष्यात समस्या निर्माण होऊ शकते. तुमचा क्रेडिट स्कोर कमी झाल्याने बँका पुन्हा कर्ज देण्यास प्राधान्य देत नाही. याचा परिणाम केवळ विद्यार्थीच नाही तर कर्जासाठी सह-अर्जदार असलेल्या पालकांवर देखील होतो. भविष्यात कोणत्याही कामासाठी कर्ज हवे असल्यास अडचणी येतात.
कायदेशीर नोटीस कर्जाचे काही हफ्ते चुकवल्यानंतर बँकेकडून सर्वात प्रथम कर्जदाराला कायदेशीर नोटीस पाठवली जाते. त्यानंतरही कर्ज वेळेवर न फेडल्यास हमीदारालाही कायदेशीर नोटीस बजावली जाते. यामुळे हमीदाराच्या विश्वासार्ह्यतेवर परिणाम होतोच. सोबतच, हमीदाराच्या क्रेडिट स्कोरवरही परिणाम होण्याची शक्यता असते.
मालमत्ता जप्तबँकेकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी वेळोवेळी नोटीस बजावली जाते. तरीही कर्ज न फेडल्यास कर्जदारास डिफॉल्टर घोषित केले जाते व कर्ज घेताना तारण ठेवलेली मालमत्ता जप्त केली जाते. अशा मालमत्तेचा लिलाव करून बँकेकडून पैशांची भरपाई केली जात असते. यामुळे तारण ठेवलेल्या मालमत्तेवरील मालकी गमवावी लागू शकते.

वेळेवर भरा शैक्षणिक कर्जाचे हफ्ते

क्रेडिट स्कोरवरील परिणाम, मालमत्ता जप्ती व कायदेशीर प्रक्रियेपासून वाचायचे असल्यास शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यास प्राधान्य द्यायला हवे. तुम्ही खर्च व बचतीचे योग्य नियोजन करून वेळेवर कर्ज फेडू शकता. तुम्हाला जर कर्जाच्या हफ्त्यांची रक्कम भरणे शक्य नसल्यास बँकेकडून ही रक्कम कमी करण्यासाठी विनंती करू शकता. मात्र, ईएमआयची रक्कम कमी झाल्यास कर्ज परतफेडीचा कालावधी वाढू शकतो.