• 03 Jun, 2023 17:46

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone 13 Vs iPhone 14: जाणून घ्या किंमत आणि फीचर्समधील फरक!

iPhone 13 Vs iPhone 14

iPhone 13 Vs iPhone 14: आयफोन 14 लॉन्च झाला असला तरीही आयफोन 13 हा अजूनही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. आयफोन 13 आणि आयफोन 14 च्या किमतीत 10 हजार रुपयांचा फरक आहे; आणि तो योग्य आहे का? असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो.

अॅपलने 7 सप्टेंबर, 2022ला त्यांच्या इतर प्रोडक्टसह iPhone 14 ची सिरीज लॉन्च केली. या सिरीजची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. या सिरीजमध्ये काही नवीन फीचर्स आहेत. iPhone 14 आणि iPhone 14 Plus यामध्ये (A15 Bionic) चिपसेट वापरली. या आयफोन 14 च्या सीरिजमध्ये मिनी मॉडेलऐवजी, 14 प्लस जोडले गेले. ज्यामध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले वापरला आहे.

तसेच iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max वरील नॉच पुन्हा डिझाईन केले. विशेष म्हणजे या आयफोनचा Display आता सतत चालू असणार आहे. आयफोनमध्ये 2000 नीट्स ब्राईटनेस आहे. कॅमेर्‍याबद्दल सांगायचे झाले तर, आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लसचा कॅमेरा सेटअप 12 + 12MP आहे. पण आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो प्लस 48MP प्रायमरी कॅमेरासह लॉन्च केले.


आयफोन 14 (iPhone 14) लॉन्च झाला असला तरीही आयफोन 13 (iPhone 13) ला अजूनही ग्राहकांची पसंती आहे. नवीन मॉडेल लॉन्च केल्यानंतर कंपनीने जुन्या मॉडेलची किंमत काही प्रमाणात कमी केली. पाहायला गेलं तर आयफोन 14 अगदी आयफोन 13 सारखाच दिसतो. आयफोन 14 मध्ये एक मोठा आणि उजळ कॅमेरा सेन्सर दिला आहे. यासोबतच इमर्जन्सी एसओएस आणि क्रॅश डिटेक्शन यासारखे फिचर्स सॅटेलाईटद्वारे देण्यात आले आहेत.

आयफोन 13 आणि आयफोन 14 यात फरक काय? 

आयफोन 14 ची बेसिक किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. तर आयफोन 13ची  किंमत 69,900 रुपये आहे. आयफोन 14चा लूक हा आयफोन 13 सारखाच आहे. दोन्ही मोबाईलची बाहेरील बॉडी ही ग्लास आणि अॅल्युमिनियमपासून बनलेली आहे. दोन्ही फोनच्या मागील बाजूचे कॅमेरेदेखील सारखेच आहेत. दोन्हीमध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले आहे. तुम्हाला जर यापेक्षा मोठी स्क्रीन हवी असेल तर तुम्ही 6.7 इंचाचा आयफोन 14 प्लस खरेदी करू शकता. आयफोन 14 च्या प्रोसेसरमध्ये आयफोन 13 च्या तुलनेत 18 टक्के अपग्रेडेशन करण्यात आले. नवीन सिरीजमधील फोनची बॅटरीही आधीच्या मॉडेलपेक्षा चांगली देण्यात आली.

आयफोन 14 मध्ये झालेल्या काही प्रमुख अपडेटमध्ये कॅमेरासुद्धा समाविष्ट आहे. मागील मॉडेलप्रमाणे, नवीन फोनमध्ये मागील बाजूस फक्त दोन 12MP कॅमेरे आहेत. मात्र यावेळी मुख्य सेन्सर खूपच मोठा आहे. तसेच यामध्ये f/1.5 अॅपर्चर देखील देण्यात आला. त्यामुळे या फोनमधून पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे फोटो काढता येतील. कमी प्रकाशातही यातून चांगले फोटो निघू शकतात, असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये व्हिडिओसाठी नवीन अॅक्शन मोडही देण्यात आला आहे. इमर्जन्सी सपोर्ट आणि सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीद्वारे क्रॅश डिटेक्शन यासारखी वैशिष्ट्ये आयफोन 14 मध्ये देण्यात आली आहेत.

चांगली डील काय असू शकते?

आयफोन 13 आणि आयफोन 14 च्या किमतीत 10 हजार रुपयांचा फरक आहे; आणि तो योग्य आहे का? असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. तर लेटेस्ट सिरीजमधील वैशिष्ट्ये पाहत iPhone 14 मध्ये iPhone 13 च्या तुलनेत काही चांगले अपग्रेड्स आहेत. प्रामुख्याने सांगायचं झालं तर अपग्रेड कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी. जर तुम्ही तुमच्या फोनचा वापर फोटो आणि व्हिडिओसाठी करत असाल तर, नवीन आयफोन 14 अपग्रेड करणं योग्य ठरू शकतं. याव्यतिरिक्त, मोठा डिस्प्ले असलेला फोन म्हणून  आयफोन 14 प्लस हा एक पर्याय उपलब्ध झाला आहे. पूर्वी फक्त आयफोन प्रो मॅक्स हा एकमेव पर्याय होता.