Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ॲपलचा 2022 मधील सर्वांत महागडा iPhone 14 लॉन्च! जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरंच काही!

iPhone 14 launch

Apple iPhone 14 launched: ॲपलने सालाबादप्रमाणे यावेळीही सप्टेंबर महिन्यात iPhone 14 लॉन्च केलाय. यापूर्वीचे दोन मॉडेल ॲपलने कोविडमुळे ऑनलाईन लॉन्च केले होते. यावेळी मात्र ॲपलने iPhone 14चं प्रत्यक्षात लॉन्चिंग केलंय.

Apple iPhone 14 launched: ॲपलच्या iPhone 14 सिरिजची (Apple iPhone 14) ॲपलप्रेमी खूप आतुरतेने वाट पाहत होते. ती सिरीज अखेर बुधवारी (दि. 7 सप्टेंबर) रात्री लॉन्च झाली. ॲपलने गेल्या 2 वर्षांतील मॉडेलची लॉन्चिंग कोरोनामुळे ऑनलाईन केले होते. पण यावर्षी पुन्हा एकदा ॲपलने iPhone 14 या लेटेस्ट मॉडेलचे प्रत्यक्षात लॉन्चिंग केले. कंपनीने iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max या लेटेस्ट स्मार्टफोनच्या मॉडेलसोबतच Apple Watch Series 8, Watch Pro लॉन्च केला.

इतक्या किमतीत मिळणार iPhone 14!

ॲपलचा iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 1,29,900 आणि 1,39,900 रुपये इतकी आहे. हे दोन्ही फोन डीप पर्पल, गोल्ड आणि स्पेस ब्लॅक या रंगांमध्ये आणि 128GB, 256 GB, 512GB आणि 1TB इतक्या स्टोरेजमध्ये उपलब्ध आहेत. भारतासह इतर 30 देशातील ग्राहकांना 9 सप्टेंबरपासून iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांची प्री-ऑर्डर करता येईल आणि हा स्मार्टफोन 16 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल.

नवीन डिस्प्ले फीचर्स

iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे दोन्ही फोनला 6.1 आणि 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला. या डिस्प्लेवरील ब्राईटनेट्स लेव्हल 1600 नीट्स इतकी देण्यात आली. ती 2000 नीट्सपर्यंत जाऊ शकते. ॲपल कंपनीचं असं म्हणणं आहे की, इतर दुसरी कोणतीही मोबाईल कंपनी इतका ब्राईटनेस लेव्हल देत नाही.

iPhone 14 Series New Features
फास्टेस्ट प्रोसेसर आणि सीपीयू

iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये नवीन A16 बायोनिक प्रोसेसरचा वापर करण्यात आला. यामुळे आयफोन 14 चा कॅमेरा, बॅटरीलाईफचा दर्जा आणखी सुधारेल, असा दावा कंपनीने केला. तसेच यामध्ये 4 नॅनोमीटर चीपचा वापर करण्यात आला. कंपनीने 14 व्या सिरीजमध्ये वापरलेला A16 बायोनिक प्रोसेसर हा सध्या इतर कोणत्याही कंपनीने वापरलेला नाही. ते याचा वापर सर्वाधिक जलद प्रोसेसर म्हणून याचा वापर करू शकतात. जो ॲपलने आयफोनच्या लेटेस्ट मॉडेलमध्ये अगोदरच वापरला आहे. यामध्ये देण्यात आलेला 6 core cpu हा इतर मोबाईलच्या तुलनेत 40 टक्के फास्ट असल्याचा दावाही कंपनीने केला.

12 मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर!

ॲपलने आपल्या लेटेस्ट मॉडेलमध्ये 12 मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाईड सेन्सर वापरला आहे. (12 MP telephoto sensor and 12MP ultra-wide sensor). ग्राहकांना अल्ट्रा वाईड सेन्सरमुळे मॅक्रो फोटोग्राफी खूपच चांगली करता येईल, असा कंपनीने दावा केला. iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max या दोन्ही मॉडेलमध्ये फोटोनिक इंजिनचा वापर केल्याने यामधून कमी प्रकाशातही ग्राहकांना चांगले फोटो काढता येतील. यामध्ये अक्शन मोड आणि सिनेमॅटिक मोडचा वापर करून 4k रिझोल्यूशनपर्यंतचा वापर करता येणार आहे. तसेच फ्रंटसाईडला 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला.

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्चिंग!

ॲपलने सालाबादप्रमाणे यावर्षीही सप्टेंबर महिन्यात iPhone 14 चे लॉन्चिंग केलंय. यापूर्वीही ॲपलने iPhone च्या वेगवेगळ्या सिरिजचे लॉन्चिंग सप्टेंबर महिन्यात केले होते.