Flipkart Sale : सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 23 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टचा डिस्काऊंट बोनान्झा सेल (Discount Bonanza Sale) सुरू होत आहे. हा सेल 30 सप्टेंबरपर्यंत सुरू असणार आहे. 'फ्लिपकार्टच्या वार्षिक बिग बिलिअन सेल' (Flipkart annual Big Billion Day Sale)च्या 7 दिवसांत नवनवीन प्रोडक्ट्सवर, स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, ॲक्सेसरीज, घरासाठी उपयोगी पडणाऱ्या वस्तुंवर भरमसाठ सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये iPhone हा आश्चर्यकारक किमतीत उपलब्ध होणार आहे. जे iPhone वापरण्याचं स्वप्न पाहत आहेत; त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.
फ्लिपकार्टचा वार्षिक बिग बिलिअन डे सेल (Flipkart annual Big Billion Day Sale)मध्ये Apple कंपनीच्या iPhoneच्या जुन्या सिरीज जसे की, iPhone 11, iPhone 12 आणि iPhone 13 यावर मोठा डिस्काऊंट मिळणार असून हे फोन ग्राहकांना खूपच कमी किमतीत मिळण्याची शक्यता आहे.
50 हजारांच्या आत iPhone 13!
फ्लिपकार्ट खासकरून ॲपल कंपनीचा iPhone 11, जो आयफोनच्या 4G सिरीजमधला शेवटचा फोन आहे; तो 35 हजारांपर्यंत विकला जाण्याची शक्यता आहे. अद्याप फ्लिपकार्टने किंमत जाहीर केलेली नाही. iPhone 12 मिनी हा फोन सेलमध्ये 40 हजारांपर्यंत विकला जाण्याची शक्यता आहे, असं इंडियन एक्सप्रेसने म्हटलंय. तर आयफोन 13 हा सेलमध्ये 49,990 रुपयांना विकत मिळू शकतो. ही किंमत ग्राहकाला बॅंकेची ऑफर स्वीकारून किंवा थेट याच किमतीत किंवा कॅशबॅकच्या ऑफरमधून मिळणार आहे, हे फ्लिपकार्टने अजून स्पष्ट केलेले नाही. iPhone 13 हा 5G ला सपोर्ट करणारा फोन आहे; त्याचबरोबर त्यात A15 ही चीप वापरण्यात आली. जी iPhone 14 च्या सिरीजमध्ये सुद्धा आहे. iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max हे फोनसुद्धा सेलमध्ये अनुक्रमे 90 हजार आणि 1 लाख रुपये या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये बॅंकेच्या कार्डवर मिळणाऱ्या ऑफर्सचा समावेश करण्यात आला आहे.
बिग बिलिअन सेलमध्ये अजून काय?
ॲपल कंपनीच्या iPhone व्यतिरिक्त फ्लिपकार्ट बिग बिलिअन डे सेलमध्ये इतर नामांकित कंपन्यांचे ॲण्ड्रॉईड फोन ऑफर्ससह कमी किमतीत मिळणार आहेत. यात Poco F4 हा स्मार्टफोन 21,999 रुपये, Oppo Reno 8 हा फोन 26,999 रुपये आणि Moto Edge 30 हा फोन 22,749 रुपये यांचा समावेश असणार आहे. या व्यतिरिक्त पोको, इन्फिनिक्स, मोटोरोला, ओप्पो, रिअलमी आणि अशा बऱ्याच (Poco, Infinix, Motorola, Oppo, Realme & More) कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर सूट मिळणार आहे.