Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जाणून घ्या iPhone 13 चे खास 13 फिचर्स; iPhone 14 ला ठरू शकतो पर्याय!

iPhone 13 Features

iPhone 13 Features : नुकताच iPhone 14 लॉन्च झाला आहे; पण त्याच्या किमती ऐकून Apple Lovers आजही iPhone13 लाच पसंती देत असल्याचं दिसून येतंय. काय आहेत iPhone 13 चे फीचर्स जाणून घेऊयात.

iPhone 13 Features : जर तुम्ही Apple Lovers आहात आणि iPhone 14 घेण्याचा विचार करत आहात. पण किंमत ऐकून तुम्हाला तुमची इच्छा दाबावी लागत आहे. पण निराश होऊ नका. कारण iPhone 13 चे फीचर्स आजही लोकांना आवडत आहेत. ते त्याला अधिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी iPhone 13 चे टॉप 13 फीचर्स घेऊन आलो आहोत.

Apple ने 7 सप्टेंबर, 2022 ला iPhone 14 लॉन्च केला. लॉन्चिंगपूर्वी लोकांमध्ये याची खूप क्रेज आणि एक्साईटमेंट होती. पण iPhone 14 लॉन्च झाल्यानंतर मात्र त्याची किंमत आणि फीचर्स पाहून त्यांची पसंती iPhone 13 ला असल्याचे दिसून येते.

हे आहेत iPhone 13 चे टॉप फीचर्स

कॅमेरा (Camera)

iPhone 13 ची सर्वांत मोठी खासियत म्हणजे त्याचा कॅमेरा आहे. यामध्ये नवीन wide angle दिला, जो लो नॉईस आणि ब्राईट इमेजसाठी 47 टक्के अधिक लाईट कॅप्चर करते. कंपनीने यामध्ये 1.7 सेंसर पिक्सल आणि f/1.6 अपर्चरसह सेंसर शिफ्ट ऑप्टिकल स्टेबलायझेशन दिला आहे. या कॅमेरा नाईट मोड खूप चांगल्याप्रकारे काम करतो. iPhone 13मध्ये 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा सुद्धा आहे. त्याचा अपर्चर f/2.4 आहे. या कॅमेराच्या मदतीने तुम्ही सिनेमासुद्धा बनवू शकता. 

फास्ट प्रोसेसर (Fast Processor)

या फोनमधील प्रोसेसर फास्ट आहे. यामध्ये iPhone 14 मध्ये जी A15 चीपसेट दिली आहे; तिच चीपसेट iPhone 14 मध्ये सुद्धा आहे. यामुळे या फोनचा सीपीयू खूप फास्ट चालतो.

सुंदर लूक (Beautiful Look)

डिझाईनच्याबाबतीत सुद्धा iPhone 13 हा थोडा वेगळा दिसतो. या मॉडेलमध्ये कंपनीने मागील मॉडेलच्या तुलनेत चांगले बदल केले होते. त्यामुळे डिझाईननुसारही या सिरीजला लोकांची चांगली पसंती मिळाली होती.

मजबूत डिस्प्ले (Strong Display)

डिस्प्लेच्याबाबतीत सुद्धा हा फोन जबरदस्त मानला जातो. अर्थात यापेक्षा चांगला डिस्प्ले iPhone 14 आहे. पण iPhone 13 चा डिस्प्लेसुद्धा भारीच आहे. यामध्ये तुम्हाला 120Hz चा प्रमोशन रिफ्रेश रेटवाला डिस्प्ले देण्याता आला. याचा वापर तुम्ही 10hHz ते 120 Hz पर्यंत वापरू शकता. याचा ब्राईटनेस 1200 निट्स आहे. तसेच HDR डिस्प्लेसह ट्रू टोन ऑटोमॅटिक कलच टेंपरेचर अडजस्टमेंट ऑप्शनसुद्धा देण्यात आला.

बॅटरी (Battery)

iPhone 13 ची बॅटरी ही मागील सिरीजच्या तुलनेत नक्कीच चांगली आहे. त्याची क्षमता 3240 mAh इतकी आहे; तर iPhone 14 बॅटरी ही 3279 mAh इतकी आहे. म्हणजे फक्त 40 mAhचा फरक आहे.

स्क्रीन साईज (Screen Size)

iPhone च्या जुन्या मॉडेलची स्क्रीन साईज खूपच लहान होती. Apple Lovers कडून मोबाईलची साईज वाढवण्यासाठी मागणी होत होती. त्यानुसार कंपनीने iPhone 13 ची साईज 6.1 इंच केली. iPhone 14 ची साईजसुद्धा तेवढीच देण्यात आली. आणखी काही स्पेशल 7 फीचर्स आपण खाली पाहणार आहोत.


iPhone 13 ची आणखी काही सायलंट फीचर्स 

iPhone 13 मध्ये 3 बोटांनी दोनदा टच केल्यानंतर undo चा ऑप्शन देण्यात आला.

iPhone 13 च्या बुक सेक्शनमध्ये रिडिंग गोल्सचा ऑप्शनसुद्धा दिला गेला.

यामधील आणखी एक सायलंट फीचर आहे; जे खूपच मजेशीर आहे. यामध्ये तुम्ही जेव्हा सब्सक्रिप्शन घेतलेलं App जेव्हा डिलीट करण्यासाठी जाता. तेव्हा मोबाईल तुम्हाला ते डिलीट करण्यापूर्वी चेतावणी देतो.

यात सायलेंस अननॉन कॉलर हे एक अनोखं फीचर देण्यात आलं. जे वापरकर्ता सेटिंगमध्ये जाऊन सुरू किंवा बंद करू शकतो.

या फीचर्सच्या मदतीने तुम्ही थेट App Store वर जाऊन कोणत्याही App ला फोनमधून Uninstall करू शकता. 

iPhone 13 मध्ये Safari Tab स्वत:हून बंद होतो. हा कमालीचे फीचर मानले जाते. 

याशिवाय iPhone 13 तुम्हाला चांगल्या Location Privacy Setting देतो. 

तर आयफोन 13 या फीचर्समुळे आजही Apple Loversसाठी एक चांगला फोन आहे. त्यामुळे तुम्हालाही iPhone 14 ची किंमत परवडत नसेल किंवा तो तुमच्या बजेटमध्ये बसत नसेल तर तुमच्यासाठी iPhone 13 एक चांगलं ऑप्शन ठरू शकतं.