“जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घडी आ गई... आ गई...”, या गाण्यासारखंच ॲपलप्रेमी iPhone 14ची (Apple iPhone 14) आतुरतेने वाट पाहत होते. तो अखेर बुधवारी (दि. 7 सप्टेंबर) रात्री लॉन्च झाला. iPhone 14 च्या लॉन्चिंगपूर्वी सोशल मिडियावर सगळीकडे जोरदार चर्चा होती. कारण सप्टेंबर महिना उजाडला की, ॲपल कंपनी लेटेस्ट आयफोन (Latest iPhone) बाजारात आणणार हे समीकरण गेल्या काही वर्षांत इतकं फिट्ट बसलंय की, ॲपलप्रेमी लेटेस्ट आयफोन लॉन्चिंगची तारीख, त्याचे नवीन फीचर्स आणि किंमत काय असणार, याबाबत खूपच अलर्ट असतात.
तर खरंच यावर्षीही ॲपलने सालाबादप्रमाणे सप्टेंबर महिन्यात iPhone 14 लॉन्च केलाय. iPhone 13च्या बेसिक मॉडेलची किंमत 72 हजारांच्या आसपास होती. मग आता iPhone 14च्या बेसिक मॉडेलची किंमत किती असणार? यात नवीन फीचर्स कायकाय असणार? यावर सोशल मिडियामध्ये बऱ्याच बातम्या येत होत्या. पण त्यामध्ये काही तत्थ नाही, असंही मिडियामधून फिरत होतं. हे सर्व सांगण्यामागचा मतितार्थ इतकाच की, भारतात iPhone चं गारूड इतकं भिनलंय की, त्याच्याबद्दलची कोणतीही बातमी वाऱ्यासारखी वायरल होते. पण आम्ही तुम्हाला iPhone च्या बाबतीत 7 अशा गोष्टी सांगणार आहोत; ज्यामुळे तुमची आर्थिक बचत होऊ शकते आणि तुम्ही iPhone च्या नादात फायनान्शिअर कचाट्यात सापडणार नाही.
• iPhone घेताना Credit Card वर 15 ते 18 महिन्यांचा EMI घेऊ नका. क्रेडिट कार्डच्या compounding interest मुळे दमछाक होऊ शकते. शक्यतो क्रेडिट कार्डचा ईएमआय 3 ते 6 महिन्यातच संपवा.
• ईएमआय वर iPhone विकत घेण्याआधी फोनच्या किमतीच्या किमान 80 टक्के रक्कम तयार ठेवा.
• ईएमआयवर फोन घेतल्यानंतर शक्यतो EMI चुकवू नका. क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून आकारला जाणारा दंड (Penalties) भरून तुमच्या नाकी-नऊ येईल.
• तुमचा Cibil Score कमी असेल तर ईएमआयवर आयफोन विकत घेण्याचं धाडस करू नका. अन्यथा तुम्हाला ईएमआयवर जास्त interest द्यावा लागेल.
• ईएमआयवर आयफोन विकत घ्यायचाच असेल तर त्यापूर्वी वेगवेगळ्या बॅंकांचे क्रेडिट ऑप्शन्स तपासा (Check credit options). तसेच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील किमतीची माहिती घ्या.
• iPhone 14 मार्केटमध्ये आल्यावर तुम्हाला जर तुम्हाला परवडेल अशा किमतीत iPhone 13 मिळत असेल तर तो विकत घ्या. पैशांची ओढाताण करून iPhone 14 चा अट्टाहास धरू नका.
• आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्ही आता iPhone 14 विकत नाही घेऊ शकला तरी नाराज होऊ नका. पुढच्या सप्टेंबरमध्ये iPhone 15 लॉन्च होईलच. तो विकत घेण्यासाठी तुम्ही आजपासूनच बचत सुरू करा.
इथे दिलेले पर्याय तुम्हाला एकतर खूपच अवघड वाटतील. पण यामुळे तुम्ही financial कचाट्यात सापडणार नाही, हे मात्र नक्की!