स्मार्टफोन सगळेच वापरतात; पण आयफोन वापरणाऱ्यांची ऐट काही औरच आहे. आयफोन हा जगभरात तांत्रिकदृष्ट्या सर्वांत सुरक्षित फोन मानला जातो. पण त्याचबरोबर आयफोन वापरणं हे स्टेसस सिम्बॉल मानलं जातं. त्यामुळे प्रत्येकाची इच्छा होते की, एकना एक दिवस मी सुद्धा आयफोन विकत घेईल. पण आयफोनच्या किमती पाहता तो सहज परवडण्यासारखा फोन नाही. सप्टेंबर, 2021 मध्ये लॉण्च झालेल्या Apple iPhone 13 च्या बेसिक मॉडेलची भारतातील किंमत 71,990 रूपये आहे.
आयफोनच्या किमती या आतापर्यंत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहिल्या आहेत. या फोनच्या किमतीत मुलांची वर्षभराची शाळेची फी भरली जाऊ शकते. तर कोणाचा एका महिन्याचा घराच्या लोनचा हप्ता भरला जाऊ शकतो. कोणी एवढ्या किमतीत बाईक विकत घेऊ शकतो. म्हणून तर या आयफोनचा नाद सहसा कोणी करत नाही.
स्मार्टफोन आता सगळेच वापरू लागले आहेत. ग्रामीण भागातही रेग्युलर फीचर फोन वापरणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी होऊ लागली आहे. पण या स्मार्टफोन वापरणाऱ्यांमध्येही काही चोखंदळ ग्राहक आहेत. जे नेहमीच अद्ययावत तंत्रज्ञान (latest Technology) असलेले फोन वापरण्यास पसंती देतात. काही जण नवीन व्हर्जन (Version) येण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. हे झाले अॅण्ड्रॉईड (Android) आणि विंडोस (Windows) प्लॅटफॉर्म वापरणारे युझर्स. पण यात आयओएस (iOS) वापरणाऱ्यांची बातच काही औरच असते.
एका सर्व्हेनुसार, भारतातील एका सर्वसाधारण व्यक्तीला Apple iPhone 13 विकत घेण्यासाठी अंदाजे 3667 तास काम करावे लागेल. तर व्हेनेझुएला (Venezuela) देशातील नागरिकांना 7,063 तास काम करावे लागेल. सर्वांत कमी डेन्मार्कमधील नागरिकांना 61 तास काम करावे लागेल.
किमान वेतनावर आधारित आयफोन 13 विकत घेण्यासाठी व्हेनेझुएला देशामधील नागरिकांना 7000 तास आणि भारतीयांना 3700 तास काम करावे लागेल. 3700 कामाचे तास हा कालावधी एका वर्षापेक्षा जास्त आहे. यावरून हे दिसून येते की, भारतात किमान वेतन हे इतर देशांच्या तुलनेत फारच कमी आहे.
आयफोन 13 चे मॉडेल गेल्यावर्षी भारतात लॉण्च झाले आहे. या नवीन मॉडेलमध्ये मागील मॉडेलपेक्षा किरकोळ बदल केले असूनही त्याची किंमत खूप आहे. भारतात iPhones च्या किमती खूप असल्याने बरेचसे लोक या किमती कमी होण्याची किंवा त्यावर सूट मिळण्याची वाट पाहत असतात. पण तरीही आयफोनच्या किमती पाहता एका सर्व्हेनुसार एखाद्या व्यक्तीला किमान वेतनावर आधारित वेगवेगळ्या देशातील नागरिकांना iPhone 13 विकत घेण्यासाठी किती तास काम करावे लागेल याची तपशीलवार माहिती दिली आहे. अर्थात तुम्ही कुठे राहता, फोनवरील इम्पोर्ट ड्युची (Import Tax) आणि चलनातील चढउतारावर आधारित iPhone किमती वेगवेगळ्या असू शकता.
image source - https://bit.ly/3P5Omk4