Blinkit iPhone 14 Delivery : ब्लिनकीट ॲपचा (Blinkit App) वापर तुम्ही किराणा सामान खरेदी करण्यासाठी नक्कीच वापरले असेल. कारण क्विक डिलेव्हरी ही ब्लिनकीटची खासियत आहे. हीच खासियत पुढे करत ब्लिनकीटने iPhone घरपोच देण्याची सेवा सुरू केली. यासाठी ब्लिनकीटने ॲपल रिसेलर युनिकॉर्नसोबत पार्टनरशिप केली. कंपनीने याबाबत अवघ्या 10 मिनिटांत iPhone 14 घरपोच देण्याची घोषणा केली. त्याबाबत ब्लिनकीटचे अलबिंदर धिनसा (Albinder Dhindsa) यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
ॲपलने काही दिवसांपूर्वीच आयफोन 14ची सिरीज लॉन्च केली होती. iPhone सोबतच ॲपलने Apple Watch पण लॉन्च केले होते. या प्रोडक्ट्सची 16 सप्टेंबरपासून विक्री सुरू झाली आहे. आयफोनच्या या विक्रीत ब्लिनकीट सुद्धा उतरला असून त्यांनी काही मिनिटांत iPhone 14 घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. सध्या ही सुविधा फक्त मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्येच सुरू आहे.
काही मिनिटांत मिळणार iPhone 14 घरपोच!
ब्लिनकीट कंपनीच्या दाव्यानुसार मुंबई आणि दिल्लीतील ग्राहकांना iPhone 14ची घरपोच डिलेव्हरी काही मिनिटांत दिली जाणार आहे. यासाठी ग्राहकांना ब्लिनकीटचे अपडेटेप ॲप वापरावे लागणार आहे. आयफोन 14 हा फोन आणि इतर प्रोडक्टचा डिलेव्हरी टाईम हा युनिकॉर्न स्टोअरच्या टाईमनुसार असणार आहे. म्हणजे युनिकॉर्न स्टोअर जोपर्यंत सुरू आहे; त्यानुसार ब्लिनकीट आयफोनची डिलेव्हरी देणार.
iPhone 14 ची किंमत किती आहे?
ॲपलने iPhone 14 सिरीजमध्ये 4 मॉडेल लॉन्च केले आहेत. यामध्ये iPhone 14 Plus हा फोन अजून विक्रीसाठी उपलब्ध झालेला नाही. आयफोन 14 ची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. तर iPhone 14 Plus ची किंमत 89,000 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये फोनच्या स्टोरेजनुसार त्याच्या किमतीत वाढ होते.