Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Payment Apps: युपीआय पेमेंटसाठी तुम्ही कोणते ॲप वापरता?

Famous UPI Payment Apps

Image Source : www.quora.com

UPI Payment Apps: सध्या युपीआयचा वापर करून अनेक प्रकारची वेगवेगळी ॲप्स डिजिटल पेमेंटची ही सेवा ग्राहकांना देत आहेत. प्रत्येक ॲपने आपापला एक ग्राहक वर्ग तयार केला आहे. यापैकी कोणती ॲप्स डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरली जातात, याबद्दल जाणून घेणार आहोत.

UPI Payment Apps: केंद्र सरकारने राबविलेला डिजिटल इंडिया कार्यक्रम (Digital India Programme) आणि टेक्नॉलॉजीच्या वाढत्या वापरामुळे डिजिटल पेमेंटच्या वापरात दरवर्षी 50 टक्क्याने वाढ होत आहे. युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) डेव्हलप केलेले प्रोडक्ट आहे. युपीआय ॲपमुळे एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात लगेच पैसे ट्रान्सफर करता येतात.

सध्या युपीआयचा वापर करून अनेक प्रकारची वेगवेगळी ॲप्स डिजिटल पेमेंटची ही सेवा ग्राहकांना देत आहेत. प्रत्येक ॲपने आपापला एक ग्राहक वर्ग तयार केला आहे. यापैकी तुम्ही कोणते ॲप डिजिटल पेमेंटसाठी वापरता आणि या प्रत्येक ॲपबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी युपीआय म्हणजे काय? हे समजून घेऊ.

युपीआय म्हणजे काय?

युनीफाईड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface) म्हणजेच युपीआय डिजिटल पेमेंट करण्याची प्रणाली आहे. जी भारताने स्वत: विकसित केली. युपीआय प्रणालीमुळे मोबाईलद्वारे बॅंकांमध्ये पैसे ट्रान्सफर करता येतात, ते ही सहजरीत्या. यामुळे रोख पैसे नसतानाही पैशांचे व्यवहार करता येतात. युपीआयमधून पैसे पाठवताना लॉगिन करण्याची, खाते क्रमांकाची (Bank Account Number) किंवा आयएफएससी कोड (IFSC Code)ची गरज लागत नाही.

युपीआयची निर्मिती नॅशनल पेमेन्ट कॉपोरेशन ऑफ इंडिया (NCPI)ने विकसित केली आहे. याचे नियमसुद्धा एनसीपीआयद्वारे राबविले जातात. अर्थात या संस्थेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियंत्रण आहे. एनसीपीआय (NCPI) पैशांच्या डिजीटल व्यवहारांसाठी वेगवेगळ्या प्रकारची टूल्स तयार करते. युपीआय (UPI) हे बँक ग्राहकांसाठी तयार केलेलं असंच एक टूल आहे.

भारतात युपीआयची सेवा देणारी ॲप्स

PhonePe

युपीआयची सेवा देणारे फोन पे हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे युपीआय ॲप आहे. या ॲपची निर्मिती 2015 मध्ये करण्यात आली होती आणि याची सेवा सध्या ICICI Bank द्वारे दिली जात आहे. फोन पे हे ॲप वॉलमार्टच्या मालकीचे आहे. एनपीसीआयने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2022 मध्ये भारतातील डिजिटल पेमेंटमध्ये फोन पे चा वापर 48 टक्के होता.

Google Pay

फोन पे नंतर सर्वाधिक वापरले जाणारे युपीआय ॲप म्हणजे Google Pay. भारतात जवळपास 34 टक्के लोकांकडून गुगल पे चा वापर केला जातो. गुगलने 2011 मध्ये हे ॲप आणले होते. त्यावेळी त्याचे नाव Android Pay असे होते. ते 2017 मध्ये बदलून Tez असे केले आणि पुन्हा 2018 मध्ये त्याचे Google Pay असे नामकरण करण्यात आले.

Paytm

मोबाईल आणि केबल डीटीएच सेवांचे रिचार्ज करण्याची सेवा देणारे Paytm हे ॲप सुद्धा पैसे पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. सुरूवातीला पेटीएम हे वॉलेट सर्व्हिस देणारे ॲप म्हणून प्रसिद्ध होते. पण आजच्या घडीला वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक सेवा देणारे सुपर फायनान्शिअल ॲप (Super Financial App) बनले आहे.

BHIM App

केंद्र सरकारने सुरू केलेल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा भाग म्हणून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (National Payment Corporation of India-NPCI) भीम ॲपची (BHIM App) निर्मिती केली होती.  या ॲपच्या मदतीने युपीआय, बँक अकाउंट नंबर किंवा बँकेच्या आयएफएससी कोडच्या मदतीने पैसे ट्रान्सफर करता येतात. या ॲपवर इतर आर्थिक सेवा दिल्या जात नाही. पण यातून युटिलिटी बिल पेमेंट, ईएमआय, म्युच्युअल फंड एसआयपीचा हप्ता, इन्शुरन्सचा हप्ता भरता येतो.

MobiKwik

मोबिविक हे सुद्धा 2009 मध्ये मोबाईल रिजार्च ॲप म्हणून सुरू झाले होते. हळुहळू त्यामध्ये बदल होत गेला आणि आज मोबिविक ॲपवरून डिजिटल वॉलेट आणि इतर पेमेंट सुविधांचा वापर करता येतो. याचा वापर केल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या पेमेंटवर ग्राहकांना कॅशबँकसुद्धा दिला जातो.

मोबिविकवरून इन्शुरन्स खरेदी करता येतो. क्रेडिट कार्डचे बिल भरता येते. बाय नाऊ पे लेटरसारखी सुविधा वापरता येते. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक तसेच कमी रकमेचे कर्जसुद्धा घेता येते.

Amazon Pay

ॲमेझॉन पे हे सुद्धा सुरूवातीला प्री-पेमेंट वॉलेट म्हणून सुरू झाले होते. त्यावरून आता युपीआय पेमेंटचा वापर करता येतो. ॲमेझॉन किंवा इतर प्रकारच्या शॉपिंगसाठी यावर अनेकप्रकारच्या ऑफर्स ग्राहकांना दिल्या जातात. ॲमेझॉन पे वरून तिकिटे बूक करता येतात. युटिलिटी पेमेंट करता येतात. म्युच्युअल फंड, एफडी, गोल्ड आणि इन्शुरन्स खरेदी करता येतो.

या प्रसिद्ध ॲपसोबतच CRED, Feeecharge, iMobile App, TATA Neu आणि Jio Pay सारखी ॲपसुद्धा युपीआयची सेवा देत आहेत.