Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Payment: TATA चे सुपर अ‍ॅप Tata Neu लॉन्च

Digital Payment: TATA चे सुपर अ‍ॅप Tata Neu लॉन्च

Image Source : www.ey.com

टाट ग्रुपने Tata Neu या अ‍ॅपद्वारे युपीआय क्षेत्रात उडी घेतली असून टाटाची पेटीएम, गुगल पे, फोनपे आणि अ‍ॅमेझॉन पे या कंपन्यांशी थेट स्पर्धा असणार आहे.

टाटा समूहाचे सुपर अ‍ॅप्लिकेशन Tata Neu हे अ‍ॅप गुरूवारी (दि. ०७) पासून लाईव्ह झाले आहे. या अ‍ॅपद्वारे अनेक डिजिटल सेवा वापरता येणार आहेत. आयपीएल 20-20 क्रिकेट सामन्यातील लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान 7.30 वाजता होणाऱ्या लाईव्ह मॅचमध्ये या अ‍ॅपचे लॉन्चिंग करण्यात आले. 

whatsapp-image-2022-04-07-at-71529-pm.jpeg

Tata Neu अ‍ॅपवर सध्या टाटा ग्रुपची एअर एशिया, बिगबास्केट, क्रोमा, आयएचसीएल, स्टारबक्स, टाटा क्लिक, वेस्टासाईड यासारखे अनेक ब्रॅण्ड असणार आहेत. काही दिवसांनी त्यात विस्तारा, एअर इंडिया, टायटन, तनिष्क, टाटा मोटर्स यांचा लवकरच समावेश केला जाणार आहे, असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी लिंक्डइन पोस्ट मध्ये लिहिले.

लिंक्डइन पोस्टमध्ये एन चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे की, Tata Neu हे एक अद्भुत प्लॅटफॉर्म आहे. ज्याने आमच्या सर्व ब्रँड्सना एका शक्तीशाली छत्रछायेखाली आणले आहे. आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेऊनच टाटाच्या नाविन्यपूर्ण उत्पदनांचा अद्भूत अनुभव देण्यासाठी हा नवीन मार्ग शोधला आहे. सध्या हे  अ‍ॅप डाउनलोड करता येते. पण त्याच्यातील फीचर्सचा वापर फक्त टाटा समूहाच्या कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित आहे. Tata Neu या एकाच बॅनरखाली एअरलाईन्स, हॉटेल्स, औषधे आणि किराणा सामान अशा सर्व सेवांचा आनंद वापरकर्त्यांना घेता येणार आहे.

डिजिटल पेमेंटमुळे बाजारातील अर्थव्यवस्थेचे स्वरूपच बदलून गेले आहे. सरकारने कॅशलेस व्यवहारांसाठी सुरू केलेल्या BHIM अ‍ॅप बरोबरच गुगल पे (Google Pay), फोन पे (phone pay), अ‍ॅमेझॉन पे (Amazon pay) आणि पेटीएम (PTM) नंतर आता टाटा ग्रुप ही UPI क्षेत्रात उतरला आहे. 

टाटाच्या UPI अ‍ॅपची पेटीएम, गुगल पे, फोनपे आणि अ‍ॅमेझॉन पे या कंपन्यांशी थेट स्पर्धा असणार आहे. सध्या यूपीआय किंवा डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये फोन पे आणि गुगल पे यांचा सर्वाधिक (83%) वापर केला जात आहे. त्यानंतर पेटीएम, अ‍ॅमेझॉन अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप यांचा क्रमांक लागतो.