Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आयकर परतावा (ITR): कसा भरावा आणि उशिरा भरल्यास किती दंड?

आयकर परतावा (ITR): कसा भरावा आणि उशिरा भरल्यास किती दंड?

इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे सरकारला आपल्या वार्षिक उत्पन्नाचा आणि कराच्या देयकांचा लेखाजोखा देण्याची अधिकृत प्रक्रिया. यात तुम्ही मागील आर्थिक वर्षात किती कमावले, किती कर भरला किंवा बाकी आहे, याचा तपशील नमूद करावा लागतो.

इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे सरकारला आपल्या वार्षिक उत्पन्नाचा आणि कराच्या देयकांचा लेखाजोखा देण्याची अधिकृत प्रक्रिया. यात तुम्ही मागील आर्थिक वर्षात किती कमावले, किती कर भरला किंवा बाकी आहे, याचा तपशील नमूद करावा लागतो.


कोणाला ITR दाखल करणे आवश्यक?
जर तुमचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर आयकर परतावा भरणे बंधनकारक आहे. नोकरी करणारे, व्यावसायिक, पेन्शनधारक, भाडे किंवा गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवणारे सर्वजण यात समाविष्ट होतात. जरी तुमचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असले, तरी ITR दाखल केल्याने भविष्यात अनेक फायदे मिळतात, जसे की कर्ज मंजुरी, व्हिसा मिळवणे, किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे सोपे होते.

ITR फाइल करण्याचे फायदे

  • बँक कर्ज घेण्यासाठी विश्वासार्हता वाढते.
  • गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्र म्हणून स्वीकारले जाते.
  • परदेश प्रवासासाठी व्हिसा प्रक्रियेत मदत होते.
  • भविष्यातील आर्थिक नोंदी पारदर्शक राहतात.

आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • पगार स्लिप / फॉर्म 16
  • बँक स्टेटमेंट
  • टीडीएस सर्टिफिकेट
  • 26AS फॉर्म
  • व्याजाचे प्रमाणपत्र

ITR फॉर्मचे प्रकार

  • ITR-1: पगार, पेन्शन किंवा व्याजावर ५० लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांसाठी
  • ITR-2: ज्या व्यक्तींचे उत्पन्न व्यवसायातून नाही त्यांच्यासाठी
  • ITR-3: नोकरी किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी
  • ITR-4: ५० लाखांपर्यंत पगार व २ कोटींपर्यंत व्यवसायिक उत्पन्नासाठी
  • ITR-5 ते ITR-7: संस्था, भागीदारी फर्म, कंपन्या, ट्रस्ट, विद्यापीठे यांच्यासाठी
Exemption of deposit taxes announced

ऑनलाइन ITR कसा भरावा?

www.incometax.gov.in

  • या संकेतस्थळावर लॉगिन करा.
  • योग्य असेसमेंट वर्ष आणि फॉर्म निवडा.
  • उत्पन्न, कर आणि कपातींची माहिती अचूक भरा.
  • सबमिट करून ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
  • सबमिशननंतर ई-मेल/एसएमएसद्वारे पुष्टी मिळेल.

उशिरा ITR भरल्यास दंड

  • जर तुम्ही ठराविक तारखेपूर्वी ITR भरला नाही, तर दंड आकारला जातो.
  • उत्पन्न ₹5 लाखांपेक्षा कमी असल्यास ₹1,000 ते ₹5,000 पर्यंत दंड.
  • उत्पन्न ₹5 लाखांपेक्षा जास्त असल्यास ₹5,000 ते ₹10,000 पर्यंत दंड.
  • म्हणून वेळेत ITR दाखल करणे आवश्यक आहे.