मुंबई : म्युच्युअल फंडामध्ये SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा गुंतवणुकीचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय पर्याय मानला जातो. दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून सामान्य गुंतवणूकदारही मोठा निधी उभारू शकतो. अगदी ५०० रुपयांपासून SIP सुरू करता येते. दीर्घकाळ गुंतवणूक केली तर करोडपती होण्याची संधी मिळते.
१५ वर्षांची गुंतवणूक – किती मिळेल परतावा?
तज्ज्ञांच्या मते, सरासरी १५ टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर १५ वर्षांच्या SIP गुंतवणुकीत चांगला निधी तयार होऊ शकतो.
१५,००० रुपये गुंतवणूक : एकूण निधी अंदाजे ₹९२.४५ लाख
१६,००० रुपये गुंतवणूक : एकूण निधी जवळपास ₹९८.६१ लाख
१७,००० रुपये गुंतवणूक : एकूण निधी ₹१.०४ कोटींपेक्षा जास्त
SIP का फायदेशीर?
गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात की SIP मध्ये “कंपाऊंडिंग” चा मोठा फायदा मिळतो. म्हणजे मिळालेल्या व्याजावर पुन्हा व्याज मिळत जाते. त्यामुळे निधी झपाट्याने वाढतो. हा पर्याय पगारदार वर्ग, व्यवसायिक, गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त ठरतो.