Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real Estate: कार्पेट, बिल्ट अप आणि सुपर बिल्ट अप एरिया म्हणजे नक्की काय? कोणत्या आधारे विकतात प्रॉपर्टी?

Real Estate

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्रात सुव्यवस्था आणण्यासाठी आणि प्रत्येक गुंतवणूकदाराला योग्य माहिती मिळावी व त्याची फसवणूक होऊ नये याकरिता 2016 मध्ये रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (RERA) कायदा आणण्यात आला.

Real Estate: घर खरेदी करणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा निर्णय असतो. हा निर्णय घेताना अतिशय काळजीपूर्वक आणि विचार करून गुंतवणूक करावी लागते. रिअल इस्टेट क्षेत्रात रहिवासी(Residential Property) आणि व्यावसायिक मालमत्ता(Commercial Property) अशा दोन विभागांमध्ये मालमत्ता विभागली जाते. कोविड सारख्या महामारीमध्ये लोकांना खऱ्या अर्थाने घराची किंमत कळू लागली. म्हणूनच तर परिस्थिती थोडी स्थिर स्थावर झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी स्वतःचं घर घेण्यासाठी पसंती दिली. त्यामुळॆच आज या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोक गुंतवणूक करत आहेत. कोणतीही मालमत्ता खरेदी करताना तुम्हाला कार्पेट एरिया, बिल्टअप व सुपर बिल्ट अप एरिया(Carpet, Built Up and Super Built up area) असे शब्द सहज कानावर पडतात. पण तुम्हाला माहिती आहे का? यापैकी कोणत्या घटकावर आधारित घरांची विक्री केली जाते. चला तर याबद्दल आज जाणून घेऊयात.

रिअल इस्टेट क्षेत्रात सुव्यवस्था आणण्यासाठी आणि प्रत्येक गुंतवणूकदाराला योग्य माहिती मिळावी व त्याची फसवणूक होऊ नये याकरिता 2016 मध्ये रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी(RERA) कायदा आणण्यात आला. त्यानंतर मालमत्ता विक्रीमध्ये अनेक निकष पाडले गेले. त्यानुसारच कार्पेट एरिया, बिल्टअप व सुपर बिल्ट अप एरिया(Carpet, Built Up and Super Built up area) हे घटक वेगवेगळे करण्यात आले.

कार्पेट एरिया म्हणजे काय?(What is carpet area?)

कार्पेट एरिया(Carpet Area) बद्दल थोडक्यात समजून घ्यायचे झाले तर ज्यामध्ये तुम्ही कार्पेट टाकून ती जागा वापरू शकता म्हणजेच चार भिंतींच्या आतली फरशी बसविलेली वापरायोग्य जागा. या जागेमध्ये जिने, लिफ्ट, लॉबी, बाहेरील भिंती, टेरेस इत्यादींचा समावेश होत नाही. मात्र, फ्लॅटच्या आतील भिंती या कार्पेट एरियामध्ये गणल्या जातात.

बिल्ट-अप एरिया म्हणजे काय?(What is built-up area?)

बिल्ट-अप(Built-Up) एरियामध्ये कार्पेट क्षेत्राव्यतिरिक्त भिंतींनी घेतलेले क्षेत्र समाविष्ट करण्यात आलेले असते. यामध्ये बाल्कनी, टेरेस, फ्लॉवर बेड सारखी जागा देखील समाविष्ट करण्यात येते, जे सामान्यतः वापरले जात नाहीत. एक लक्षात घ्या बिल्ट-अप एरिया हा नेहमीच कार्पेट एरियापेक्षा मोठा असतो.

सुपर बिल्ट अप एरिया म्हणजे काय?(What is super built up area?)

गृहनिर्माण सोसायटीमध्ये विविध सामायिक जागा असते. खरेदीदाराला या क्षेत्रांच्या देखरेखीसाठी मासिक देखभाल शुल्क(Maintenance) भरावे लागते. सुपर बिल्ट अप एरियावर येण्यासाठी बिल्डर्स सामान्यत: लोडिंग फॅक्टरचा वापर करतात. कॉरिडॉर, लिफ्ट, लॉबी, इत्यादींसह सामान्य क्षेत्रांनी व्यापलेल्या क्षेत्रासह एकूण बिल्ट-अप क्षेत्र जोडून विकासक युनिटच्या सुपर-बिल्ट अप एरियावर पोहोचतात. काही बाबतीत बिल्डर्स पूल, उद्याने आणि क्लबहाऊस सारख्या सुविधा देखिल यात अंतर्भूत करत असतात. 

व्यावसायिकांना कोणत्या एरियाच्या आधारे फ्लॅट विकता येतो?

2016 मध्ये रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी(RERA) कायदा आणण्यात आला त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांना घराची विक्री करताना कार्पेट एरियानुसार विक्री(Sale flat under Carpet area) करण्याचे आदेश सरकारने दिले. 2016 पूर्वीच्या मालमत्तेमध्ये अशा कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याने व्यावसायिकांनी मोठी जागा असल्याचे सांगून अनेकांना बक्कळ लुटले आहे.