Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flat vs Plot: फ्लॅट की प्लॉट लोकांची कशाला पसंती?

Plot vs Flat

Flat vs Plot: तुम्हाला ही बऱ्याच वेळा प्रश्न पडतो का, की जमीन खरेदी करावी की फ्लॅट? चला तर याचं उत्तर जाणून घेऊयात.

Flat vs Plot: पूर्वी घरातली मोठी माणसं सांगायची की, चार पैसे जमा करून एखाद्या जमिनीचा(Land) तुकडा खरेदी करून ठेवा. आता जमीन नाही पण निदान फ्लॅट(Flat) तरी खरेदी करावा असा विचार असतो. कारण जमीन खरेदी करण्यासाठी हल्ली जमीनचं नाहीये आणि अपार्टमेंटमध्ये फ्लॅट(Apartment Flat) खरेदी करणं देखील खूप मोठी गोष्ट आहे. कारण प्लॉट(Plot) आणि फ्लॅटच्या(Flat) किमती गगनाला भिडल्यात. तुम्हाला ही बऱ्याच वेळा प्रश्न पडतो का, की जमीन खरेदी करावी की फ्लॅट? चला तर याचं उत्तर जाणून घेऊयात.

सर्वे काय सांगतो?

प्रॉपटेक प्लॅटफॉर्म हाऊसिंग डॉटकॉम(PropTech Platform Housing.com) या वेबसाईटने या संदर्भात देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये एक रिसर्च(Research) केला होता. या रिसर्चमधून समोर आलेल्या माहितीनुसार शहरातील प्लॉट्सच्या किमतीत दरवर्षी 7 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तर त्या तुलनेत अपार्टमेंटच्या(Apartment) किमतीत दरवर्षी केवळ 2 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मोठ्या शहरांमध्ये आता जमीनी शिल्लक न राहिल्याने हाऊसिंग डॉट कॉमचे सीईओ ध्रूव अग्रवाल(Dhruv Aggarwal, CEO of Housing.com) यांच्या म्हणण्यानुसार निवासी फ्लॅट्समध्ये(Residential Flat) गुंतवणूक करणं अधिक फायदेशीर ठरताना सध्या दिसून येत आहे. ही समस्या जवळपास प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. शहराच्या विकासामुळे तेथे स्थलांतरित करणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने मोठ्या जमिनींची कमतरता भासू लागली आहे. ध्रूव अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार कोरोना महामारीमध्ये प्लॉट्स आणि इंडिपेन्डंट प्लोअर्सच्या(Independent Floor) मागणीत प्रचंड वाढ पाहायला मिळाली आहे.

या शहरांमध्ये लोकांची पसंती फ्लॅटलाचं

दिल्ली(Delhi), मुंबई(Mumbai), पुणे(Pune), बंगळुरू(Banglore), हैदराबाद(Hyderabad), चेन्नई(Chennai), कोलकाता(Kolkata) आणि अहमदाबाद(Ahmadabad) या देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये लोक सामान्यत: प्लॉट्सच्या तुलनेत फ्लॅट खरेदी करण्याला अधिक पसंती दर्शवत आहेत. फ्लॅट्सला पसंती दर्शवण्यामागे सुरक्षा(Safety) आणि इतर सुविधा(Other Facility) हे मुख्य कारण असल्याचं आढळून आलं आहे. जसे की अपार्टमेंटमध्ये पावर बॅकअप(Power Backup), कार पार्किंग(Car Parking), क्लब(Club), जीम(Gym), स्विमिंग पूल(Swimming Pool) आणि गार्डन एरिया(Garden Area) इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत. प्लॉटमध्ये अशा सुविधांची कमतरता ही सतत भासते.

प्लॉट्सच्या किमती तरीही अधिक

हाऊसिंग डॉटकॉमच्या यांच्या अहवालानुसार 8 शहरांमध्ये फ्लॅट्सची मागणी अधिक असली तरीही प्लॉट्सच्या किमतीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार फ्लॅटच्या तुलनेत प्लॉट्स तुम्हाला अधिक रिटर्न्स(Returns) मिळवून देतात. गुरूग्राममधील प्रमुख परिसर आणि दक्षिण भारताताली हैद्राबाद, बंगळुरू आणि चेन्नईत विशेषत: 2018 सालानंतर रेसिडेन्शियल प्लॉट्सच्या(Residential Plot) किमतीमध्ये दुपटीने वाढ पाहायला मिळाली होती. शहरात जमीनीच्या किमतीत 13 ते 21 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून गेल्या 3 वर्षात अपार्टमेंटच्या किमतीत 2 ते 6 टक्क्यांच्या घरात वाढ झालेली आहे.

प्लॉट्सच्या मागणीत दक्षिण भारत अव्वल

2018 ते 2021वर्षाच्या कालावधीत हैद्राबादमध्ये 21 टक्के कम्पाऊंड वार्षिक वृद्धी दरात प्लॉट्समध्ये सर्वाधिक वृद्धी झाल्याचे पाहायला मिळत आहे. शंकरपल्ली आणि पाटनचेरी, तुक्कुगुडा, महेश्वरम आणि शादनगर हैद्राबाद(Hyderabad) येथील जागा या अव्वल स्थानी होत्या. याठिकाणी 2021या वर्षात मागणी आणि किंमत या दोन्ही विभागात वृद्धी पाहायला मिळाली होती. चेन्नईत(Chennai) प्लॉट्सच्या किमतीत 2018 ते 2021 मध्ये तब्बल 18 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली होती.

उत्तर भारतामधील गुरूग्राम अव्वल स्थानी

दिल्लीच्या बाजाराचा विचार करायचा झाल्यास गुरूग्राम(Gurugram) येथे रेसिडेन्शियल प्लॉट्सच्या किमतीत 2018 ते 2021 या कालावधीत 15 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. द्वारका एक्स्प्रेसवे सोबतच सेक्टर 99, सेक्टर 108, न्यू गुरूग्राममध्ये सेक्टर 95ए, सेक्टर 70ए आणि सेक्टर 63 मध्ये निवासी जमीनीच्या दरात 2021 मध्ये वाढ अधिक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.