Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 Date & Time: बजेटची तारीख, वेळ, कोण सादर करणार? संपूर्ण माहिती जाणून घ्या

Budget 2023 Date & Time

Budget 2023 Date & Time: 2023-24 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण सादर करणार आहेत. 1 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11 वाजता त्या लोकसभेमध्ये तो सादर करतील.

Budget 2023 Date & Time: केंद्रीय अर्थसंकल्प हा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या भारतातील सर्वांत मोठा कार्यक्रम मानला जातो. कारण या बजेटवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. तर आज आपण बजेट 2023 (Budget 2023) सादरीकरण कधी, कुठे, कोण करणार, तसेच ते सर्वसामान्यांना पाहता येईल का? आणि पाहायचे असेल तर कुठे पाहू शकतो? याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. लोकसभेचे अधिवेशन 31 जानेवारी, 2023 पासून सुरू होणार आहे.

2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11 वाजता सादर केला जाईल. गेल्या काही वर्षात देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस आणि वेळ ही निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार यावेळचा अर्थसंकल्पही 1 फेब्रुवारीला लोकसभेत वाचला जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पाद्वारे देशाचा मागील वर्षातील खर्च आणि आगामी वर्षातील संभाव्य खर्च सादर केला जातो. भारतात अर्थसंकल्प हा देशाचे अर्थमंत्री सादर करण्याची परंपरा आहे. त्यानुसार देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitharaman, Finance Minister, Govt of India) या बजेट सादर करणार आहेत.

2023-24च्या अर्थसंकल्पाची तारीख, वेळ आणि सादरीकरण

2023-24च्या अर्थसंकल्पाची तारीख, वेळ आणि सादरीकरण

अर्थसंकल्प निर्मिती 

केंद्र सरकार

अर्थसंकल्पाचे सादरीकरण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण

सादरीकरणाची तारीख

1 फेब्रुवारी, 2023

सादरीकरणाची वेळ

सकाळी 11.00 वाजता

स्थळ

लोकसभा व राज्यसभा, संसद भवन

मान्यता

राष्ट्रपती

अर्थसंकल्पाचा कालावधी काय असतो?

केंद्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन केंद्र सरकार दोन सत्रामध्ये घेते. पहिले सत्र 31 जानेवारी  ते 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत चालेल आणि दुसरे सत्र मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन मे महिन्यात संपेल. 

अर्थसंकल्पाचे भाषण कुठे पाहता येईल?

केंद्रीय अर्थसंकल्पाचे लाईव्ह सादरीकरण लोकसभा आणि राज्यसभेच्या अधिकृत चॅनेलवर किंव YouTube चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय सर्व न्यूज चॅनेलवरही सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाचे भाषण पाहता येईल. तसेच 'महामनी'च्या वेबसाईटवरही अर्थसंकल्पाचे लाईव्ह भाषण पाहता येईल. याशिवाय इंग्रजीतून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पीय भाषणाचा अर्थ व माहिती MahaMoney.com वर मराठीतून वाचा.

अर्थसंकल्प म्हणजे काय?

अर्थसंकल्पाला इंग्रजी भाषेत बजेट असे म्हणतात. कॉलेजमध्ये शिकणारी मुले असो किंवा घर सांभाळणारी गृहिणी असो किंवा देशाचा जमा-खर्च सांभाळणारा अर्थमंत्री असो, या सगळ्यांनाच बजेटची भारी चिंता असते. कारण ते सगळ्यांना प्रत्यक्ष मॅनेज करावे लागते. त्यासाठी काटकसर करावी लागते. बचत करावी लागते. जमा-खर्चाचा मेळ साधावा लागतो. उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे लागतात. या सगळ्या प्रक्रियेला इंग्रजीत बजेट आणि मराठीत अर्थसंकल्प म्हणतात.

अर्थसंकल्पाचे प्रकार असतात का?

अर्थशास्त्रीय भाषेत अर्थसंकल्पाचे साधारणत: खालीलप्रमाणे 3 प्रकार पडतात. 

शिलकीचा अर्थसंकल्प (Surplus Budget) – या अर्थसंकल्पात सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च कमी असतो.
समतोल अर्थसंकल्प (Balanced Budget) – या अर्थसंकल्पात सरकारचे खर्च आणि उत्पन्न दोन्ही समान असतात.
तुटीचा अर्थसंकल्प (Deficit Budget) – या अर्थसंकल्पात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो.budget-banner-revised-20.jpg