Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Oilseed crop Production : गळीत धान्याच्या उत्पादन वाढीसाठी 524 कोटींचा आराखडा; मराठवाड्याला होणार फायदा

राज्य शासनाकडून एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळीतधान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना (productivity growth and value chain devlopment) जाहीर करण्यात आली होती. या आर्थिक वर्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 524 कोटींच्या निधीच्या खर्चाचा आराखडा सादर करण्याचे सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदापासून शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ करण्यासाठी शासनाची मदत होणार आहे.

Read More

Ujani Dam Impact on Economy : पावसाअभावी उजनी धरण रिकामेच; सोलापूर जिल्ह्याचे अर्थकारण बिघडणार?

उजनी धरणाच्या माध्यमातून सोलापूर शहर पाणीपुरवठ्यासह, शेती आणि उद्योगासाठी पाणी पुरवठा केला जातो. सोलापूर जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्था पूर्णत: उजनी धरणावर अवलंबून आहे. तसेच साखर कारखानदारी, द्राक्ष-डाळींब फळबागायती शेती आणि औद्योगिक क्षेत्र या सर्वांसाठी उजनी धरण एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे.

Read More

Wheat procurement: अवकाळी पावसामुळे गव्हाचे नुकसान! शेतकऱ्यांकडून खरेदी करताना सरकार नियमावली शिथिल करणार?

मागील वर्षी रब्बी हंगामात उष्णतेच्या लाटेमुळे गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे संपूर्ण देशभरात गव्हाचे दर कडाडले होते. किरकोळ बाजारात तर गव्हाचे दर 3 हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले होते. दरम्यान, यावर्षीही अवकाळी पाऊस आणि गारपीटीने गहू पिकाचे नुकसान झाले आहे. पूर्णत: गहू पिक वाया गेले नसले तरी गव्हाची गुणवत्ता खालावली आहे. उत्तरेकडील राज्यांना खराब हवामानाचा फटका बसला.

Read More

Rabi Crop: तीव्र उन्हाळ्यामुळे रब्बीचं पीक धोक्यात! शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम होतील?

यंदाचा उन्हाळा शेतीसाठी आणि एकंदर अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचा इशारा घेऊन आला आहे. तीव्र उन्हामुळे रब्बी हंगामातील पिकांचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊ शकते. उत्पन्न घटल्यामुळे भाववाढही होऊ शकते. गहू पिकाचे उत्पन्न उष्णतेच्या लाटेमुळे कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Read More