Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Opening Bell: शेअर्स मार्केट तेजीत! कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालावर गुंतवणूकदारांचे लक्ष

कॉर्पोरेट कंपन्यांचे आज (बुधवार) तिमाहीचे निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय भांडवली बाजारात तेजी दिसून येत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात ट्रेड करत आहेत. दरम्यान, आशियाई देशातील शेअर बाजार संथ गतीने सुरू आहेत. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर बाजारावर परिणाम होऊ शकते. टीसीएससह अनेक कॉर्पोरेट कंपन्या आज तिमाही निकाल जाहीर करणार आहेत.

Read More

Market Closing Bell: शेअर मार्केटमध्ये तेजी! सेन्सेक्स 60 हजारांपार; बँक, मेटल आणि ऑटो कंपन्यांचे भाव वधारले

भारतीय भांडवली बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. सलग सहा दिवसांपासून शेअर मार्केट हिरव्या रंगात ट्रेड करत आहे. सेन्सेक्स 300 पेक्षा जास्त अंकांनी वधारला. तर निफ्टी 98 अकांनी वर गेला. उद्या कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. आज दिवसभरात मेटल, बँक आणि ऑटो क्षेत्र डिमांडमध्ये राहिले. तर आयटी क्षेत्राचे शेअर्स खाली आले.

Read More

Market Opening Bell: सेन्सेक्स 60 हजार अंकांच्याही पुढे, जागतिक मार्केटच्या तुलनेत भारतीय बाजार सुस्थितीत

भांडवली बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सलग सहा दिवस शेअर मार्केट हिरव्या रंगात ट्रेड करत असून प्रगती दर्शवत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर वरती गेले. सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीही वधारला आहे. उद्यापासून कंपन्यांचे तिमाहीचे निकाल जाहीर होतील. त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसत आहे.

Read More

Market Opening Bell: तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शेअर बाजारात किंचित वाढ; Q4 च्या निकालाकडे गुंतवणुकदारांचे लक्ष

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये किंचित वाढ झाली. या आठवड्यात चौथ्या तिमाहातील निकाल जाहीर होणार आहेत. तसेच भाववाढीचा डेटा आणि अमेरिकेतील चौथ्या तिमाहीचे निकालही जाहीर होणार आहेत. या घडामोडींच्या पाश्वभूमीवर शेअर बाजारात मोठी हालचाल दिसू शकते. गुंतवणूकदारांनी आज सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

Read More