Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Disaster Fund : जून ते ऑक्टोबरमधील नैसर्गिक आपत्तीसाठी वाढीव दराने नुकसान भरपाई; किती मिळणार मदत?

अनेक ठिकाणी महापुराचे पाणी गावात शिरल्याने काही वेळा घरे, यासह व्यावसायिक दुकाने यांचेही नुकसान होते. अशा प्रकारे नुकसान झाल्यास राज्य आपत्ती निवारण निधीमधून (SDRF) मालमत्तेच्या नुकसानीस आर्थिक मदत केली जाते. दरम्यान राज्य सरकारने जून ते ऑक्टोबर 2023 या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Irshalgad Landslide : इरशाळवाडी दुर्घटनेतील 41 बाधित कुटुंबांना आर्थिक मदत; प्रतिकुटुंब 1 लाख रुपये मिळणार

इराशळवाडी येथील नैसर्गिक आपत्तीनंतर एकूण 43 कुटुंबातील तब्बल 144 लोक बचावले आहेत. त्यांचे संसार पुन्हा उभे करून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतपरी मदत करण्यात येत आहे. तसेच या घटनेत 22 मुलं निराधार झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत इरशाळवाडीच्या नैसर्गिक आपत्ती बाधित आदिवासी कुटुंबांना 41 लाखांची मदत जाहीर करण्यात आली.

Read More

Delhi Flood: पुरामुळे दिल्लीतील अर्थव्यवस्था ठप्प, 200 कोटींचं नुकसान!

यमुना नदीतील पाण्याची वाढती पातळी पाहता सीटीआयने व्यापाऱ्यांना पुढील काही दिवसांसाठी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे सामानाचे नुकसान देखील झाले आहे. दिल्लीत पाऊस आणि पुरामुळे सुमारे 200 कोटी रुपयांचा व्यवसाय प्रभावित झाल्याची माहिती चेंबर्स ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने (CTI) दिली आहे.

Read More

SMS Alert Charges: टेलिकॉम कंपन्यांना आपत्ती काळातील 'SMS अलर्ट'च्या शुल्क वसुलीला 'ट्राय'ची बंदी

SMS Alert Charges : टेलिकॉम कंपन्यांना आपत्तीबाबतचे लाखो संदेश पाठवावे लागतात. यासाठी कंपन्यांना बराच खर्च येतो. मात्र, त्यासाठी याआधी पैसे मिळत नव्हते. त्यामुळे आता हा निर्णय टेलिकॉम कंपन्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात संदेश पाठवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना संसाधने मोठ्या प्रमाणात लागतात. त्यासाठी होणारा खर्च आता प्रति संदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कंपन्या भरून काढतील.

Read More