Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या दर घसरले; जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर?

Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price Today: देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असण्याचा आजचा 204 वा दिवस असून देशातील इंधन कंपन्यांनी आजच्या दिवसातील पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Petrol Diesel Price Today: जागतिक बाजारापेठेत आज(१९ डिसेंबर) कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. आज ब्रेंट क्रूडची किंमत(Brent Crude Oil ) 80 डॉलर्सच्या खाली आली आहे. आजच्या दिवसात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 79.72 डॉलर्सच्या दरावर स्थित आहे. याशिवाय, डब्ल्यूटीआय क्रूडची(WTI Crude) किंमत प्रति बॅरल 74.90 डॉलर पाहायला मिळत आहे. 
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या दरामध्ये (Crude Oil Price) सातत्याने चढ-उतार होत असूनही देशातील पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) मात्र स्वस्त होत नाहीये. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असण्याचा आजचा 204 वा दिवस असून देशातील इंधन कंपन्यांनी आजच्या दिवसातील पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. चला तर जाणून घेऊयात आजच्या दिवसातील दर.  

आज देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत?

  • दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे 
  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे 
  • कोलकत्यामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर आहे  
  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे

आज राज्यातील कोणत्या शहरात किती दर आहे?

  • नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर व डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर व डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर व  डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये व डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी: 109.45 रुपये प्रति लिटर व डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक: पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर व डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

कोण पेट्रोल डिझेल दर जारी करते?

भारतातील सरकारी तेल कंपन्या ज्यामध्ये भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum), इंडियन ऑइल (Indian Oil) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) यांचा समावेश आहे. या कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. आज जारी केलेले दर हे जुनेच आहेत त्याच्या किंमतीमध्ये विशेष बदल झालेले नाहीत.