Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Job Opportunities: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या अप्रेंटिस पदाच्या 1760 जागांसाठी भरती जाहीर

Indian oil Jobs

Image Source : www.twitter.com

IOCL Apprentice Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार ते पदवीधरांपर्यंत सरकारी नोकरी(Government Job) मिळवण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

IOCL Apprentice Recruitment 2022: तुम्हीही सरकारी नोकरीच्या(Government Job) शोधात आहात? मग ही संधी तुमच्यासाठी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (Indian Oil Corporation) अप्रेंटिस या पदांकरिता  भरती जाहीर केली आहे. या पदांसाठीचे अर्ज 14 डिसेंबर 2022 बुधवारपासून सुरू झाले आहेत. दहावी उत्तीर्ण(SSC Pass) झालेले उमेदवार ते पदवीधरांपर्यंत(Graduates) सरकारी नोकरी मिळवण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जानेवारी 2023 पर्यंत असेल.

कोणत्या पदासाठी असेल भरती? 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या(IOCL) या भरतीमध्ये एकूण 1760 पदांची भरती करण्यात येणार आहे . या पदांमध्ये ट्रेड अप्रेंटिस(Trade Apprentice), ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस(Graduate Apprentice and Technician Apprentice) या पदांचा समावेश करण्यात आला आहे. निवड प्रक्रियेनंतर उमेदवारांची दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, झारखंड, चंदीगड, ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात इत्यादी देशभरातील विविध राज्यांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे.

कोण अर्ज करण्यासाठी पात्र असेल? 

 प्रत्येक पदानुसार अर्जदाराची पात्रता बदलणार आहे. दहावी पास झालेला उमेदवार ट्रेड अप्रेंटिसच्या पदासाठी अर्ज करू शकतो. किमान 50 टक्के गुणांसह अभियांत्रिकी उत्तीर्ण(Engineering pass) उमेदवार तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करू शकतो आणि किमान 50 टक्के गुणांसह बीए, बीएससी, बीकॉम उत्तीर्ण झालेला किंवा पदवीधर उमेदवार ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी अर्ज करू शकतात. तिन्ही प्रकरणांमध्ये, उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय डिप्लोमा देखील असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गाला(reserved category) गुणांमध्ये सूट देण्यात येईल. या तिन्ही पदांसाठी 21 ते 24 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल? 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे(Online Exam) करण्यात येईल. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न(MCQ) विचारण्यात येतील. प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय देण्यात येतील व  त्यापैकी एक बरोबर असेल. उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यांची सेवा एका वर्षासाठी(1 Year) असेल. फक्त ट्रेड अप्रेंटिस (डेटा एंट्री ऑपरेटर) 15 महिने आणि ट्रेड अप्रेंटिस (रिटेल सेल्स असोसिएट) 14 महिन्यांचा कार्यकाळ असेल.