Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Commodity : पुन्हा दूध महागले; अमूल, मदर डेअरी, यासह सर्व ब्रॅण्ड्सच्या किंमतीत होऊ शकते वाढ

Milk Rate

Commodity Section: या वर्षी नोव्हेंबरपर्यंत कंपन्यांनी दुधाच्या दरात चार वेळा वाढ केली आहे. पशुखाद्याची भाववाढ हे दुधाचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे.

देशभरात बल्क दुधाच्या (Prices of Milk) दरात सातत्याने वाढ होत असल्याने डेअरी कंपन्या पुन्हा एकदा दर वाढवू शकतात. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या (ICICI Securities) अहवालानुसार या वर्षी नोव्हेंबरपर्यंत कंपन्यांनी दुधाच्या दरात चार वेळा वाढ केली आहे. या अहवालात म्हटले आहे की, दूध खरेदी दरात सातत्याने वाढ होत असल्याने डेअरी (Milk Dairy) कंपन्यांनीही गेल्या दहा महिन्यांत दुधाचे दर आठ ते दहा टक्क्यांनी वाढले आहेत. तर जागतिक स्तरावर दूध पावडरचे दर वर्षागणिक कमी होत आहेत. पशुखाद्याची भाववाढ हे दुधाचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे दुधाच्या दरवाढीचा फटका सहन करण्यास तयार राहा.

जनावरांच्या चाऱ्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने अडचणी वाढल्या आहेत

नोव्हेंबर 2022 मध्ये वार्षिक आधारावर मक्याची किंमत 27.4 टक्के जास्त होती आणि गहू 31 टक्क्यांनी जास्त होता, ज्यामुळे पशुखाद्य महाग झाले. त्यामुळे शेतकरी भाव वाढवून दुधाच्या वाढीव खर्चाची भरपाई करतील, ज्यामुळे कंपन्यांना पुन्हा किमती वाढवणे भाग पडेल असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कंपन्यांचे उत्पन्न कमी होण्याची भीती

अस्थिर कच्च्या मालाच्या किमतींमुळे कंपन्यांना दुधाचे दर वाढवणे भाग पडले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. असे असूनही कंपन्यांच्या उत्पन्नात फारशी वाढ झालेली नाही. ICICI मधील विश्लेषकांना FY2023 च्या दुसऱ्या सहामाहीत डेअरी कंपन्यांच्या नफ्यात वर्षानुवर्षे घट होण्याची अपेक्षा आहे.