Tea Business: आपल्या सर्वांची सकाळ हीच मुळात चहापासून होते. आपण दिवसभरात किती कप चहा(Tea) पितो हेच मुळात कितीतरी जणांना माहित नसतं, इतके हे 'चहाप्रेम'. आपल्या संस्कृतीमध्ये(Culture) ही पाहुणचारासाठी चहाला विशेष प्राधान्य दिलेले आहे. पाहुणचारात फक्त चहा दिला तरी ही परंपरा पाळली जाते. आळस दूर करायचा असेल, झोप दूर करायची असेल किंवा उर्जेने भरून ताजेतवाने व्हायचे असेल, तर चहा शिवाय पर्यायच नाही.
अनेकदा काम करताना पुन्हा नव्याने ऊर्जा मिळावी यासाठी आपण चहा पितो. कटिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चहाची किंमत 10 रुपयांपर्यंत असते. पण तुम्हाला माहित आहे का ? चहावाला साधारणपणे किती पैसे कमवत असेल? या व्यवसायासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. चला तर थोडक्यात जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
चहाचे दुकान उघडण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यक असते?
चहाचे दुकान उघडण्यासाठी सगळ्यात, महत्त्वाची गोष्ट असते ती मोक्याची जागा आणि त्याठिकाणी दुकान भाड्याने(Rented shop) घेणे, स्वस्त आणि चांगल्या दर्जाचा कच्चा माल(Raw Material) ही देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. गुंतवणूक आणि कमाईशी संबंधित सर्व संभाव्य माहिती हा व्यवसाय सुरु करण्या अगोदरच गोळा करावी लागते.
कोणत्या प्रकारचा चहा तुम्ही बनवणार आहात?
हल्ली गल्लीपासून दिल्ली पर्यंत चहाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. अगदी उच्चशिक्षित तरुण सुद्धा या व्यवसायात यायला लागले आहेत. त्यामुळेच या व्यवसायाला हल्ली व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. हल्ली ग्रीन टी(Green Tea), ब्लॅक टी(Black Tea), लेमन टी(Lemon Tea), गुळाचा चहा(Jergery Tea), यासारखे कित्येक चहाचे प्रकार(Types of tea) मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जर तुम्ही या व्यवसायात येणार असाल तर या गोष्टीचा विचार नक्कीच करा.
चहाच्या व्यवसायात किती नफा मिळतो ?
चहाच्या व्यवसायामध्ये कोणत्याही दुकानदारांच्या मते, तुम्हाला 50% पर्यंत नफा हमखास मिळतो, जर तुम्ही दररोज 1000 रुपये कमवले तर सुमारे 500 रुपये नफा(Profit) आणि उर्वरित 500 रुपये खर्च असा साधा आणि सोपा हिशोब असतो. परंतु या व्यवसायासाठी एकूण गुंतवणूक(Investment) जवळपास 20 ते 25 हजार रुपये इतकी करावी लागते.
1 लिटर दुधापासून(Milk) किती चहा बनवता येतो?
1 लिटर दुधापासून तुम्ही 14 ते 16 कप चहा बनवू शकता. पण तुमचा चहा प्रसिद्ध व्हावा यासाठी दुकानाचे नाव(Shop Name), चहाची चव(Teast), चहाची किंमत(Tea Price) यांना सुद्धा तितकेच महत्त्व असते. हल्ली अनेक नामांकित चहाच्या फ्रेंचायजीस उपलब्ध आहेत. या माध्यमातून तुम्हाला या व्यवसायातील तज्ज्ञ मार्गर्शन करतात व संपूर्ण व्यवसायाचा सेटअप उभारून देतात.