Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एखादी व्यक्ती दोन ITR भरू शकते का?

एखादी व्यक्ती दोन ITR भरू शकते का?

एकाच खात्यातून वेगवेगळी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (ITR Return Filing) केली जाऊ शकतात. करदात्याला सध्याच्या चालू आर्थिक वर्षाचे आणि मागील वर्षाचे स्वत:चे, मित्राचे किंवा कुटुंबातील कोणाचेही एकाच खात्यातून रिटर्न फाईल करता येऊ शकते.

एकाच खात्यातून वेगवेगळी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (ITR Return Filing) केली जाऊ शकतात. करदात्याला सध्याच्या चालू आर्थिक वर्षाचे आणि मागील वर्षाचे स्वत:चे, मित्राचे किंवा कुटुंबातील कोणाचेही एकाच खात्यातून रिटर्न फाईल करता येऊ शकते.

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची प्रक्रिया

  • ITR Return फाईल करण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करा.
    लॉगिन केल्यानंतर नाव, जन्मतारीख, पॅन क्रमांक, बॅंक डिटेल्स आदी वैयक्तिक माहिती भरा.
  • त्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या पगाराची माहिती आणि टीडीएस (TDS)ची माहिती भरा.
  • टॅक्स कपाती अंतर्गत कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलतीचा फायदा घेण्यासाठी एलआयसी (LIC), पीपीएफ (PPF) किंवा ट्यूशन फी सारख्या गुंतवणुकीचे सर्व तपशील द्या.
  • बचत किंवा मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाचे तपशील, पगारा व्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न याची माहिती देऊन, लागू झालेल्या टॅक्स पेमेंटची नोंद करा.
  • यानंतर तुम्ही टॅक्स देय नाही किंवा परतावा पाहिल्यानंतर टॅक्स ई-फायलिंगची प्रक्रिया पूर्ण करू शकता. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक संदर्भ क्रमांक तयार होईल. तो तुम्ही संदर्भ म्हणून जतन करून ठेवा.

एकापेक्षा जास्त रिटर्न फाईल करण्याची प्रक्रिया

  • इन्कम टॅक्स विभागाच्या संकेतस्थळावर लॉगिन केल्यानंतर File other Tax Return वर क्लिक करा. 
  • नवीन इंट्री करण्यासाठी Individual वर क्लिक करा आणि Add Tax Entity करा. वेगवेगळे रिटर्न फाईल करण्यासाठी, तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडण्यासाठी पेज स्विच केले जाऊ शकते.
  • ही प्रोसेस सुरू करण्यासाठी Work on this Entity क्लिक करा.
  • प्रत्येक Entityसाठी मागील आर्थिक वर्षाचे टॅक्स रिटर्न फाईल केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला संबंधित असेसमेंट वर्ष निवडावे लागेल. त्यानंतर निवडलेला पर्याय सेव्ह करून Work on Tax Return वर परत या.

एकापेक्षा अधिक टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

इन्कम टॅक्स कायदानुसार, भारतात रिटर्न फाईल करण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत. इथे आपण काही कागदपत्रांची यादी पाहणार आहोत.

  • पॅन कार्ड 
  • फॉर्म 16 (Form-16) पगारदार व्यक्तीसाठी 
  • बॅंक स्टेटमेंट/बचत खात्यातून मिळणारे व्याज
  • मुदत ठेवींमधून मिळणारे व्याज
  • वित्तीय संस्था/बॅंकेकडून देण्यात आलेले टीडीएस सर्टिफिकेट
  • फॉर्म 26AS मध्ये टॅक्सबद्दल देण्यात आलेली माहिती.
  • कलम 80C अंतर्गत करण्यात आलेल्या गुंतवणुकीची कागदपत्रे
  • मुलांच्या शाळेची फी
  • शैक्षणिक कर्ज
  • इन्श्युरन्स 
  • स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन
  • प्रोव्हिडंट फंड


कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळवण्यासाठी अशी सर्व महत्त्वाची कागदपत्रे एकत्रित करा. कलम 80C अंतर्गत 1.5 लाखापर्यंतचे तुम्ही कर सवलत मिळवू शकता.