• 03 Oct, 2022 22:57

‘पॅन’ क्रमांकाने जाणून घ्या ‘टीडीएस’चे स्टेट्स

Tax Deduction at Source - TDS

आपला किती टीडीएस (Tax Deduction at Source - TDS) कापला जात आहे आणि किती रिफंड मिळू शकतो, हे जाणून घेण्याची सुविधा इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) उपलब्ध करून दिली आहे. वैयक्तिक पॅन क्रमाकांच्या आधारे एखाद्याचा टीडीएस कापला गेला आहे की नाही, हे समजू शकते.

इन्कम टॅक्स कायद्याच्या नियमानुसार एका निश्चित रकमेची मर्यादा ओलांडली की, टीडीएस (Tax Deduction at Source-TDS) कापून घेतला जातो. मग ते कमिशन असो, पगार असो किंवा इतर मार्गाने मिळालेले उत्पन्न असो, त्यावर टॅक्स आकारला जातो. हा टॅक्स आकारलेली म्हणजेच कपात केलेली रक्कम ज्याला ‘टीडीएस’ म्हणतात. ती वैयक्तिक पॅनकार्डमध्ये जमा केली जातो.

आजघडीला एखाद्या व्यक्तीचे उत्पन्नाचे अनेक स्रोत असू शकतात. करपात्र वेतन, मुदत ठेवीवरील व्याज आदींतून मिळणार्‍या उत्पन्नांवर टीडीएस कापला जातो. पण प्रत्येकवेळी त्याची माहिती संबंधिताला मिळतेच असे नाही. अशावेळी करदात्याचा टीडीएसवरून संभ्रम होऊ शकतो. परिणामी टॅक्स कापला जात असूनही काही जण आयटी रिटर्न (ITR Return) भरत नाहीत. त्यामुळे त्यांना टीडीएसची रक्कम मिळवण्यास अडचणी येतात.


आपला किती टीडीएस कापला जात आहे आणि किती रिफंड मिळू शकतो, हे जाणून घेण्याची सुविधा इन्कम टॅक्स विभागाने उपलब्ध करून दिली आहे. या सोयीद्वारे टीडीएसचे स्टेट्स जाणून घेता येते. वैयक्तिक पॅन क्रमाकांच्या आधारे एखाद्याचा टीडीएस कापला गेला आहे की नाही, हे समजू शकते.

पॅनक्रमांकाद्वारे टीडीएस जाणून घेण्याची प्रक्रिया काय आहे?

पॅन क्रमांकाच्या माध्यमातून टीडीएस जाणून घ्यायचा असेल तर याची ऑनलाईन प्रक्रिया जाणून घ्यायला हवी.

  • सर्वप्रथम टीडीएसच्या संकेतस्थळावर जा.
  • स्क्रिनवर व्हेरिफेकशन कोडचा बॉक्स दिसेल. तिथे बॉक्सखाली दिलेला कोड टाका.
  • त्यानंतर प्रोसिड बटणावर क्लिक करा.
  • नवीन पानावर पॅन आणि टॅन क्रमांक टाका.
  • त्यानंतर आर्थिक वर्ष (Financial Year) टाकून, क्वार्टर आणि टाईप ऑफ रिटर्न सलेक्ट करा.
  • त्यानंतर ‘गो’ बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या स्क्रीनवर टीडीएसचे संपूर्ण विवरण दिसेल.


जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत नसाल तर तुमचा टीडीएस रिफंड होईल. यासाठी आयटीआर फाईल करावे लागेल. आयटीआरमध्ये पॅन क्रमांक टाकल्यावर तुमचे संपूर्ण आर्थिक व्यवहार त्याला जोडले जातात. यात व्यवहाराद्वारे तुम्ही टॅक्स स्लॅबच्या बाहेर असाल तर कापलेली टीडीएसची रक्कम तुम्हाला परत मिळू शकते.