Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते कसे सुरु करायचे?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते कसे सुरु करायचे?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड - PPF) ही सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेली एक गुंतवणूक योजना आहे. पगारदार लोकांसाठी पीएफ (प्रॉव्हिडंट फंड) असतो; त्याच धर्तीवर पीपीएफ योजना सुरू करण्यात आली आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)  योजना ही एक दीर्घकालीन गुंतवणूकीची योजना आहे; जी आकर्षक व्याज दर आणि गुंतवणुकीच्या रकमेवर चांगला परतावा देते. या योजने अंतर्गत मिळालेले व्याज (Interest) आणि मिळकत (Returns) आयकर कायद्यांतर्गत करपात्र (Taxable) नसते.  कलम 80 C अंतर्गत PPF खात्यातील गुंतवणूकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते. या योजनेत केलेली गुंतवणूक निवृत्तीनंतर खूप फायदेशीर ठरू शकते. स्वत:च्या आणि मुलांच्या भविष्यासाठी PPF मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. 15 वर्षांनंतर पीपीएफमधून मिळणारी रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी मोठा आर्थिक आधार ठरू शकते.

पीपीएफ (PPF) खाते उघडण्यासाठी पात्रता

1. केवळ भारतीय रहिवासी PPF खाते उघडू शकतात.
2. एखादी व्यक्ती फक्त एकच PPF खाते उघडू शकते.
3. एखाद्या एनआरआय (NRI) व्यक्तीने भारतीय रहिवासी असताना उघडलेले पीपीएफ खाते, तो 15 वर्षापर्यंत सुरू ठेवू शकतो. त्यानंतर मात्र मुदत मिळत नाही.
4. कायदेशीर वयाच्या पुराव्याच्या आधारे अल्पवयीन सुद्धा PPF खाते उघडू शकतात.
5. PPF खाते उघडण्यासाठी तसेच खाते चालू ठेवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे.

PPF खाते कसे सुरू करायचे

PPF खाते ऑनलाईन किंवा ऑफलाईन देखील सुरु करता येते. 
बँकेत किंवा पोस्ट खात्यात पीपीएफ खाते उघडता येते. 
PPF खाते ऑनलाईन सुरु करण्यासाठी संबंधित बँकेचे किंवा पोस्टाचे बचत खाते असणे आवश्यक आहे. तसेच इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग सेवा असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन पद्धतीने PPF खाते उघडताना, त्याचा प्रकार निवडा. 
प्रत्येक आर्थिक वर्षात खात्यात जमा करणारी रक्कम टाका.
इथे तुम्ही ECS ही सेवा वापरून बचत खात्यातून रक्कम डेबिट होण्याचा पर्याय निवडू शकता.
शेवटी सर्व माहिती भरल्यानंतर मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) येईल तो सबमिट करा.

PPF खाते उघडण्याचे फायदे

ही योजना केंद्र सरकारद्वारे राबवली जात असल्यामुळे ती जोखीम मुक्त आहे. तसेच या योजनेत 7.1 व्याजदर दिला जातो.
PPF वरील व्याज दरवर्षी 31 मार्च रोजी जमा होते. 
कलम 80 C अंतर्गत PPF खात्यातील गुंतवणूकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्‍स सवलत मिळते.
15 वर्षांची दीर्घकालीन गुंतवणूक
3 ते 6 व्या आर्थिक वर्षादरम्यान PPF वर कर्ज घेता येते.
PPF ठेवीची रक्कम एका आर्थिक वर्षात किमान 500 ते कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत असते.
मॅच्युरिटीनंतर 5 वर्षांच्या कालावधीत PPF खाते वाढवता येते.
पीपीएफ खाते सुरू केल्यानंतर 7 व्या आर्थिक वर्षापासून पैसे काढता येऊ शकतात.

PPF खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पॅन कार्ड
चालक परवाना
मतदार ओळखपत्र
पासपोर्ट
आधार कार्ड
वीज बिल
पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे
अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा दाखला म्हणून जन्म प्रमाणपत्र
सर्व कागदपत्रे स्वत: साक्षांकित (self-attested) केलेली असावीत.