Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How To Claim Tds : फॉर्म 16 नसेल तर ई-फाईल कसे करायचे?

How To Claim Tds : फॉर्म 16 नसेल तर ई-फाईल कसे करायचे?

फॉर्म 16 नसतानाही तुम्ही तुमचे रिटर्न फाईल (Return File) करू शकता. मुळात फॉर्म 16 हे एक टीडीएस प्रमाणपत्र (TDS Certificate) आहे; ज्यातून तुमचे करपात्र उत्पन्न किती आहे.

एक पगारदार किंवा नोकरदार व्यक्ती म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Return) भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीकडून फॉर्म 16 (Form 16) मिळणे आवश्यक आहे. कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 देणे हे कंपनींसाठी बंधनकारक आहे. जर कंपनीकडून कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 मिळाला नाही तरी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. फॉर्म 16 नसतानाही तुम्ही तुमचे रिटर्न फाईल (Return File) करू शकता. मुळात फॉर्म 16 हे एक टीडीएस प्रमाणपत्र (TDS Certificate) आहे; ज्यातून तुमचे करपात्र उत्पन्न किती आहे आणि त्यावर आधारित तुमचा टीडीएस (TDS) किती कापला गेला आहे, हे कळते.


 तुमच्याकडे फॉर्म 16 नसेल तर तुम्ही खालील टप्प्यानुसार ITR फाईल करू शकता.

  1. पगाराच्या स्लिपमधून उत्पन्न आणि टॅक्स वेगळे करा
  2. 26-AS मधून टॅक्सची रक्कम शोधा
  3. भाड्याने राहत असाल तर HRA चा लाभ घ्या
  4. डिडक्शन क्लेम करा
  5. इतर स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न
  6. स्वत:च ऑनलाईन रिटर्न भरा

पगाराच्या स्लिपमधून उत्पन्न आणि टॅक्स वेगळे करा

तुम्हाला तुमच्या कंपनीकडून वर्षभरासाठी किती पगार मिळतो. याचा आकडा पगाराच्या स्लिपमधून तुम्हाला काढता येऊ शकतो. आणि तुम्ही जर वर्षभरात एकापेक्षा जास्तवेळा नोकरी बदलली असेल तर तुम्हाला प्रत्येक कंपनीकडून पगाराची स्लिप (Salary Slip) मिळवावी लागेल.

26-AS मधून टॅक्सची रक्कम शोधा

तुमच्या कंपनीने वर्षभरात तुमचा टीडीएस किती कापला आहे, हे समजून घेण्यासाठी इन्कम टॅक्स ऑफिसच्या वेबसाईटवरून फॉर्म 26AS डाऊनलोड करून तो बरोबर आहे की, नाही याची खात्री करून घ्या. प्रत्यक्षात कापलेला TDS आणि कापली जाणारी रक्कम यामध्ये तुम्हाला काही फरक दिसून येत असेल तर तुम्ही तुमच्या कंपनीशी संपर्क साधून त्यांच्या ही गोष्ट लक्षात आणून देऊन ती सुधारा.

भाड्याने राहत असाल तर HRA चा लाभ घ्या

बऱ्याच जणांच्या पगारात घरभाडे भत्ता (HRA) दिला जातो. हा भत्ता क्लेम करण्यासाठी किंवा HRA वरील टॅक्स कपातीचा दावा करण्यासाठी घराच्या भाड्याच्या पावत्या कंपनीच्या अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये सबमिट करणे आवश्यक आहे आणि तुम्ही जर या पावत्या संबंधित विभागाकडे सबमिट केल्या नसतील तर तुम्ही रिटर्न फाईल करताना यावरील दावा करू शकता.

डिडक्शन क्लेम करा

आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अनेक गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स कायद्यातील विविध नियमांतर्गत टॅक्स बेनिफिट मिळत असतो. त्यासाठी संबंधित गुंतवणुकीची कागदपत्रे सोबत ठेवून त्यातून योग्य करपात्र रक्कम काढू शकता. उदाहरणार्थ, कलम 80C अंतर्गत जीवन विमा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजना येऊ शकतात. 80D अंतर्गत मेडिकल इन्श्युरन्स प्रीमियम येतो, 80E अंतर्गत एज्युकेशनल लोनवरील व्याज (interest on education loan).   

इतर स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न

एखाद्याला नोकरीतून मिळणाऱ्या पगाराव्यतिरिक्त इतर स्त्रोतांमधून उत्पन्न मिळत असेल तर त्याचा समावेश कपपात्र उत्पन्नात करणे आवश्यक आहे. अशा उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये मुदत ठेवींवरील व्याज, मालमत्तेच्या भाड्यातून मिळणारे उत्पन्न इत्यादींचा समावेश असू शकतो.

स्वत:च ऑनलाईन रिटर्न भरा

तुम्हाला लागू झालेला टीडीएस (TDS), तुमची गुंतवणूक आणि करपात्र उत्पन्न हे योग्य असल्याची खात्री करून इन्कम टॅक्स विभागाच्या साईटवरून ऑनलाईन ई-फाईल (Online e-filling return) करा.