Maharashtra Scholarship 2023: ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची आहे; किंवा हालाखीची आहे. अशा विद्यार्थ्यांना सरकार शिष्यवृत्तीच्या (Maharashtra Govt Scholarship) माध्यमातून आर्थिक मदत करते. या शिष्यवृत्तीच्या आधारे राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. या शिष्यवृत्ती कोणत्या आहेत. त्याच्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याबाबतची इंत्यंभूत माहिती आपण घेणार आहोत.
सरकार गुणवंत विद्यार्थ्यांसोबत, विविध जातीतील, धर्मातील विद्यार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देत आहे. पैशांविना कोणाचे शिक्षण अर्धवट राहू नये. यासाठी सरकार ट्यूशन फी, शालोपयोगी वस्तू किंवा इतर शैक्षणिक वस्तू, हॉस्टेलचा खर्च अशा वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत केली जात आहे. सर्व विद्यार्थ्यांना एका छायाछत्राखाली स्कॉलरशिप मिळावी यासाठी सरकारने MahaDBT Portal सुरू केले. या पोर्टलच्या माध्यमातून दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ घेता येतो.
Table of contents [Show]
- स्कॉलरशिप कशासाठी दिली जाते?
- दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप
- दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बेस्ट स्कॉलरशिप
- बारावीनंतर उपलब्ध असलेल्या स्कॉलरशिप
- गुणवंत मुलींकरीता स्कॉलरशिप
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
- परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
- कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्कॉलरशीप
- स्कॉलरशिपचा लाभ कोणाला मिळतो?
- महाडीबीटी पोर्टलमार्फत शिष्यवृत्तीचा असा लाभ घ्या
स्कॉलरशिप कशासाठी दिली जाते?
ज्या विद्यार्थ्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताची आहे; पण त्याची शिकण्याची इच्छा आहे. अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्यक्ष आर्थिक मदत दिली जाते. तर काहीवेळेस अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येणार नाही, त्यादृष्टिने विविध वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. केंद्र आणि राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार त्यांना मदत करतात. आज आपण महाराष्ट्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपविषयीची माहिती घेणार आहोत.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप
Scholarship After 10th: स्कॉलरशिपमधून मिळालेले पैसे हे ट्युशन फी (शैक्षणिक फी), राहण्याचा खर्च आणि शिक्षणाशी संबंधित इतर खर्चासाठी वापरू शकतो. स्कॉलरशिपसाठी एक पात्रता निश्चित केलेली असते. त्या पात्रतेनुसार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, शैक्षणिक गुणवत्ता आणि इतर बाबी तपासल्या जातात. अशा स्कॉलरशिप शैक्षणिक संस्था, खाजगी संस्था, केंद्र व राज्य सरकार, व्यावसायिक कंपन्या, धर्मादाय संस्था आणि फाऊंडेशन्स यांच्याद्वारे दिल्या जातात. स्कॉलरशिप ही आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना आणि गुणवत्तेच्या आधारावर दिली जाते.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बेस्ट स्कॉलरशिप
Top Scholarship after 10th in India: दहावीचा निकाल लागून विद्यार्थ्यांनी आता पुढील वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन अभ्यास करून चांगले गुण मिळवले आहेत. अशा विद्यार्थ्यांना सरकारसह काही खासगी संस्थांकडून स्कॉलरशिप दिली जाते. यात प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपमध्ये प्राधान्य दिले जाते.
बारावीनंतर उपलब्ध असलेल्या स्कॉलरशिप
Scholarships after 12th in Maharashtra: इयत्ता दहावीप्रमाणेच सरकार बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना राबवते. यासाठी सरकारने एक किमान पात्रता निश्चित केली आहे. त्या पात्रतेनुसार संबंधित विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. यामध्ये विद्यार्थ्याची किमान शैक्षणिक पात्रता, एखाद्या विषयातील विशेष प्राविण्य, तसेच विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागास गटातील किंवा आरक्षित गटात मोडणारा असेल तर त्याला स्कॉलरशिप दिली जाते. याशिवाय जे विद्यार्थी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनाही स्कॉलरशिपचा लाभ घेता येतो.
गुणवंत मुलींकरीता स्कॉलरशिप
Encourage Girls Scholarship Scheme: आर्थिकदृष्या दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांना चांगले आणि उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी सरकारकडून विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. यातील काही शिष्यवृत्ती योजना विशेष करुन मुलींसाठी तयार केल्या जातात. शालेय ते उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू आणि गुणवंत मुलींना याचा फायदा होतो. या सर्व शिष्यवृत्ती मासिक आणि वार्षिक असतात.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
Scholarship for Rural Students: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आणि उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. सरकारकडून अनेक शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. याबाबतची माहिती वेळोवेळी शाळा व महाविद्यालयांमधून दिली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थी सरकारी शिष्यवृत्तीबरोबरच, राष्ट्रीय शिष्यवृत्ती, राज्य व प्रादेशिक शिष्यवृत्ती, एनजीओंद्वारे दिली जाणारी शिष्यवृत्ती, कॉर्पोरेट कंपन्या, विद्यापीठ यांच्यामार्फत मिळणाऱ्या शिष्यवृत्तींचा लाभ घेऊ शकतात.
परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
International scholarships: अनेक विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमधून शिक्षण घेण्याची इच्छा असते. यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारच्या संधीची वाट पाहत असतात. अशा गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध विद्यापीठे (Universities) तसेच सरकारमार्फत ही शिष्यवृत्ती मिळवता येते. प्रामुख्याने अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, युके, आशिया अशा विविध प्रदेशातल्या शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत.
कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्कॉलरशीप
Corporate Scholarships schemes: भारतामध्ये हजारो कॉर्पोरेट कंपन्या आहेत. त्यांच्याद्वारे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, पर्यावरण, जीवनावश्यक गरजा यासह अनेक गोष्टींसाठी आर्थिक आणि इतर मार्गांनी कॉर्पोरेट कंपन्यांकडून मदत करण्यात येते. कॉर्पोरेट कंपन्या शिक्षण क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात. या कंपन्या शालेय विद्यार्थ्यांपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात.
स्कॉलरशिपचा लाभ कोणाला मिळतो?
Who get the Scholarship: प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडत्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन मनासारखे करिअर करायचे असते. यासाठी ते प्रचंड मेहनतही घेतात. पण काही क्षेत्रात करिअर करताना मुलांची आर्थिक ओढाताण होते. घरातून पुरेसे आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने त्या मुलांना मनासारखे शिक्षण घेता येत नाही. काही वेळेस त्या विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. अशावेळी गरजू आणि हुशार मुलांना स्कॉलरशिपची भरपूर मदत होते. स्कॉलरशिप ही हुशार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी एक यंत्रणा आहे.
महाडीबीटी पोर्टलमार्फत शिष्यवृत्तीचा असा लाभ घ्या
- महाडीबीटी संकेतस्थळावरील विविध शिष्यवृत्तींचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला या संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे आहे.
- नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला स्वत:चे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी व्हेरिफाय करून नोंदणी करता येते.
- नोंदणी केल्यानंतर युझरनेम आणि पासवर्डच्या सहाय्याने अर्जदार लॉगिन करू शकतो.
- लॉगिन केल्यानंतर अर्जदार उपलब्ध शिष्यवृत्तींपैकी त्याच्याशी संबंधित शिष्यवृत्तीची निवड करू शकतो.
- शिष्यवृत्तीची निवड करताना अर्जदाराला विभागाची निवड करून उपलब्ध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो.
- उपलब्ध शिष्यवृत्ती योजनेवर क्लिक करून त्याच्या पात्रतेनुसार आणि कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करता येतो.