Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Scholarships after 12th in Maharashtra: बारावीनंतर उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्ती योजना

Scholarships after 12th in Maharashtra

Image Source : www.buddy4study.com

Scholarships after 12th in Maharashtra: स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करणारी योजना आहे. स्कॉलरशिपमधून मिळालेले पैसे सदर विद्यार्थी ट्युशन फी (शैक्षणिक फी), राहण्याचा खर्च आणि शिक्षणाशी संबंधित इतर गोष्टींसाठी खर्च करू शकतात. बारावीनंतर अनेकप्रकारच्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. त्याची माहिती आपण घेणार आहोत.

Scholarships after 12th in Maharashtra: स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करणारी योजना आहे. स्कॉलरशिपद्वारे विद्यार्थ्यांना कमीतकमी खर्चात किंवा काहीवेळेस मोफतसुद्धा दहावी-बारावीनंतरचे शिक्षण तसेच पदवी, पदव्युत्तर आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येते. स्कॉलरशिपद्वारे मिळणारे पैसे हे परत करावे लागत नाही. ते पूर्णत: शिक्षणासाठी खर्च करता येतात. स्कॉलरशिप आणि एज्युकेशनल लोन यामध्ये खूप फरक आहे. एज्युकेशनल लोनप्रमाणे यामध्ये विद्यार्थ्यांना कोणताही परतावा द्यावा लागत नाही.

स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थ्यांच्या नावाने किंवा तो ज्या संस्थेत/कॉलेजमध्ये शिक्षण घेणार आहे. त्यांच्या नावाने पैसे दिले जातात. स्कॉलरशिपमधून मिळालेले पैसे हे ट्युशन फी (शैक्षणिक फी), राहण्याचा खर्च आणि शिक्षणाशी संबंधित इतर खर्चासाठी वापरू शकतो.

स्कॉलरशिपसाठी एक पात्रता निश्चित केलेली असते. त्या पात्रतेनुसार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, शैक्षणिक गुणवत्ता आणि इतर बाबी तपासल्या जातात. अशा स्कॉलरशिप शैक्षणिक संस्था, खाजगी संस्था, केंद्र व राज्य सरकार, व्यावसायिक कंपन्या, धर्मादाय संस्था आणि फाऊंडेशन्स यांच्याद्वारे दिल्या जातात. स्कॉलरशिप ही आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना आणि गुणवत्तेच्या आधारावर दिली जाते.

बारावीनंतर स्कॉलरशिप मिळवण्यासाठी किमान पात्रता

किमान शैक्षणिक पात्रता 

बऱ्याच स्कॉलरशिपसाठी किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यातही संबंधित विद्यार्थ्यांने बारावीमध्ये किमान गुण मिळवणे आवश्यक आहे.

उच्च शिक्षणासाठी प्रवेश

अनेक शिष्यवृत्ती या जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात, खास त्यांच्यासाठी असतात. विशिष्ट कोर्ससाठी प्रवेश घेतल्यानंतर ते विद्यार्थी या अशाप्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात.

विशेष प्राविण्य

अनेक स्कॉलरशिप या शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित दिल्या जातात. जसे की एखाद्या विषयात किंवा शाखेत विशेष प्राविण्य मिळवले असेल तर त्याच्या आधारावर शिष्यवृत्ती दिली जाते.

आर्थिकदृष्ट्या मागास

काही स्कॉलरशीप या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती तपासून दिल्या जातात. ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप दिली जाते.

आरक्षणानुसार स्कॉलरशिप

भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र व राज्य सरकारद्वारे काही विशेष धर्मातील, जातीतील विद्यार्थ्यांना सामाजिक-आर्थिक परिस्थितीनुसार, तसेच दिव्यांग विद्यार्थी यांना वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.

तर काही शिष्यवृत्ती या विशेष कौशल्य किंवा एखाद्या क्षेत्रातील विशेष ज्ञान, खेळ, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानानुसार दिली जाते.

बारावीनंतर उपलब्ध असलेल्या स्कॉलरशिप 

विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप 

  • जे विद्यार्थी दहावीनंतरचे शिक्षण घेत आहेत. असे विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात. 
  • जे विद्यार्थी पूर्ण वेळ काम करत आहेत किंवा एकाच वर्गात दोनदा शिक्षण घेत आहेत, असे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकत नाहीत.
  • तसेच सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षात सदर विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्के असणे अनिवार्य आहे.

एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा फी स्कॉलरशिप

  • जे विद्यार्थी सरकारी/सरकारी अनुदानित संस्थांमध्ये दहावीपुढील शिक्षण घेत आहेत; त्यांच्यासाठी ओपन आहे. 
  • सदर विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • तसेच या स्कॉलरशिपच लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याने नियमित प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेणे आवश्यक आहे.

व्हिजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा फी स्कॉलरशिप

  • जे विद्यार्थी सरकारी आणि सरकारी अनुदानित संस्थांमधून पोस्ट मॅट्रिक शिक्षण घेत आहेत; ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. 
  • सदर विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • तसेच या स्कॉलरशिपच लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याने नियमित प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेणे आवश्यक आहे.


याचबरोबर किशोर वैज्ञानिक शिष्यवृत्ती योजना (KVPY), ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE), रतन टाटा स्कॉलरशिप (Ratan Tata Scholarship), केंद्रीय क्षेत्र स्कॉलरशिप (Central Region Scholarship), एमआय स्कॉलरशिप (MI Scholarship), विद्याधन स्कॉलरशिप (vidyadhan Scholarship) आणि प्राईम मिनिस्टर स्कॉलरशिपसाठी (Prime Minsiter Scholarship) अर्ज करू शकतात.