निरंकारी राजमाता शिष्यवृत्ती ही संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, दिल्ली यांच्यामार्फत सुरू केलेली एक शिष्यवृत्ती योजना आहे, जी संत निरंकारी मिशनशी संबंधित आहे. ही संस्था एक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली एक संस्था आहे.
या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात कायम ठेवणे हा आहे. ही शिष्यवृत्ती अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना खरोखरच आर्थिक मदतीची गरज आहे आणि ज्यांच्याकडे उत्तम शैक्षणिक गुणवत्ता आहे. 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीचे नूतनीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी किमान 75% गुण मिळवणे आवश्यक आहे.
ही शिष्यवृत्ती देशभरातील कुठल्याही जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. मात्र संस्थेच्या नियम व अटींचे पालन करणाऱ्या अर्जदारांचाच या शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना वार्षिक 75,000 रुपयांपर्यंत शैक्षणिक मदत या शिष्यवृत्ती योजनेत केली जाते. चला तर जाणून घेऊयात यासाठीची पात्रता आणि प्रोसेस काय आहे ते…
शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पात्रता काय?
- अर्जदार विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा
- मान्यतापात्र शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला असावा
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3,50,000 रुपयांपेक्षा अधिक नसावे
- 12 वी परीक्षेत 90% गुण मिळवलेले असावेत.
??Nirankari Rajmata #Scholarship 2023-24??#Deadline : 30th November 2023#Download the application form and attach all the documents that are mentioned in it.#Download: https://t.co/nQbvhdR8zv #Send application through #SPEED POST ONLY pic.twitter.com/XqHIogAUnt
— Sagar Bhalerao (@SagarMahamoney) August 23, 2023
कोणत्या अभ्यासक्रमांसाठी मिळेल शिष्यवृत्ती?
- सीए (CPT प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण झाल्यानंतर)
- CFA (फाउंडेशन चाचणी पात्र झाल्यानंतर)
- एलएलबी (पदवी परीक्षेसाठी पात्र झाल्यानंतर किंवा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर)
- पत्रकारिता आणि जनसंवाद
- अभियांत्रिकी पदवी (डिग्री किंवा डिप्लोमा)
- मेडिसिन क्षेत्रातील पदवी (ॲलोपॅथिक/आयुर्वेदिक/होमिओपॅथिक)
- एमबीए/पीजीडीएम
- आर्किटेक्चर अभ्यासक्रम
आवश्यक कागदपत्रे कुठली?
- संस्थेच्या वेबसाइटवर दिलेला अर्ज संपूर्ण भरलेला असावा
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- विद्यापीठ/शैक्षणिक संस्थेने दिलेली प्रवेशपत्र
- इयत्ता 10 आणि 12 चे प्रमाणपत्र
- उत्तीर्ण झालेल्या सर्व सेमिस्टर परीक्षांच्या निकालांची प्रत
- शैक्षणिक संस्थेची फी शुल्क दाखवणारे पत्रक
- रेशन कार्ड/आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट/पॅन कार्ड किंवा इतर कोणताही रहिवासी पुरावा
- विद्यार्थ्याच्या बचत बँक खात्याचा तपशील
- दोन प्रतिष्ठीत व्यक्तींचे शिफारस पत्र
संस्थेच्या वेबसाइटवर (https://nirankarifoundation.org/nirankari-rajmata-scholarship-scheme-2023-24/) दिलेला अर्ज संपूर्ण व अचूक भरलेला असावा. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत जोडा आणि पोस्टाद्वारे खाली नमूद केलेल्या पत्त्यावर 30 नोव्हेंबर 2023 पूर्वी पाठवा.
शिक्षण विभाग,संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, 80-ए, अवतार मार्ग, संत निरंकारी कॉलनी, दिल्ली - 110009
तुमच्या अर्जाची संस्थेमार्फत पडताळणी केली जाईल आणि संस्थेच्या नियम व अटींची तुम्ही पूर्तता करत असाल तर तुम्हांला संस्थेमार्फत संपर्क केला जाईल आणि पुढील कारवाईसाठी मार्गदर्शन केले जाईल.