Allen Scholarship Test 2023: राजस्थान, कोटामधील Allen क्लासेसबद्दल बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थी माहिती असेलच. जेईई (JEE),मेडिकल, नीट (NEET) अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी ॲलन क्लासेसला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या क्लासने आता शालेय स्तरावरदेखील आपले लक्ष्य केंद्रीत केले असून, 5 ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी TALLENTEX या नावाने भारतातील सर्वांत मोठी स्कॉलरशीप परीक्षा आयोजित केली आहे. या स्कॉलरशीप परीक्षेमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण 2.5 कोटी रुपयांची रोख रखमेची बक्षिसे दिली जाणार आहेत.
Table of contents [Show]
एकूण 250 कोटींची बक्षिसे
विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देण्यासाठी ॲलन क्लासेसकडून भारतातील सर्वांत मोठी स्कॉलरशीप टेस्ट परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या स्कॉलरशीपमध्ये एकूण 250 कोटी रुपयांची एकूण बक्षिसे असणार आहेत. त्यातील 2.5 कोटी रुपयांचे बक्षिसे रोख रकमेत दिली जाणार आहेत.
ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने होणार परीक्षा
ॲलन क्लासेसकडून घेतली जाणारी ही परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेतली जाणार आहे. ऑनलाईन परीक्षा 14 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे. तर ऑफलाईन परीक्षा 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे. विद्यार्थी या दोन्ही प्रकारच्या परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतात.
बक्षिसे काय मिळणार?
TALLENTEX या स्कॉलरशीप परीक्षेमधून चांगले यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या ॲलन क्लासेसच्या फी मध्ये 90 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना फक्त 10 टक्के फी भरून ॲलन क्लास जॉईंट करता येणार आहे. त्याचबरोबर एकूण विद्यार्थ्यांमधून ऑफलाईन परीक्षेतून 4750 तर ऑनलाईन परीक्षेमधून 21 हजार विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर निवडले जाणार असून त्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत.
अर्ज कसा करायचा?
विद्यार्थी TALLENTEX स्कॉलरशीपसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज TALLENTEX.COM या वेबसाईटवरून करता येईल. तसेच ऑफलाईन परीक्षेसाठी ॲलन क्लासेसच्या शाखेमध्ये जाऊन अर्ज भरावा लागेल. या परीक्षेसाठी 300 रुपये परीक्षा फी आकारली जात आहे. ऑफलाईन स्कॉलरशीप परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑक्टोबर तर ऑनलाईन परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर आहे. या परीक्षेसाठी NCERTच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.