Cummins Scholarship: क्युमिन्स इंडिया फाऊंडेशन (Cummins India Foundation-CIF)च्या वतीने 2006 पासून क्युमिन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅम; नर्चरिंग ब्रिलिअन्स हा उपक्रम राबवला जातो. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते. आतापर्यंत या स्कॉलरशिपचा जवळपास 1939 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
क्युमिन्स फाऊंडेशनकडून आर्थिक मदतीशिवाय निवड झालेल्या विद्यार्थ्यांना क्युमिन्स कंपनीतील सिनिअर कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन सुद्धा दिले जाते. हे कर्मचारी थिअरीसोबत विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल माहिती देतात. त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी मदत करतात.
Table of contents [Show]
Cummins Scholarship साठी कोण अर्ज करू शकतं
- केंद्र/राज्य सरकार/विद्यापीठ/युजीसीने मान्यता दिलेल्या कॉलेजमधून इंजिनिअरिंगचे डिग्री/डिप्लोमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- सदर विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावीत किमान 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले हवेत.
- इंजिनिअरिंगच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा डिप्लोमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाच्या सर्व परीक्षांमध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले हवेत.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 25 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- अर्ज करणाऱ्यांपैकी डिग्रीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचे तसेच डिप्लोमाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पनन 6 लाखापेक्षा अधिक नसावे.
- ही स्कॉलरशिप अहमदनगर, फलटण, पुणे, नागपूर, इंदूर, जमशेदपूर या जिल्ह्यात तसेच उत्तर महाराष्ट्र आणि झारखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.
अर्ज कसा करावा?
- क्युमिन्स स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. Apply Now यावर क्लिक करून अर्ज भरा.
- अर्धवट माहिती भरलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्जामध्ये योग्य माहिती भरलेली असावी. प्रत्यक्ष पुरावे आणि भरलेली माहिती यात तफावत असल्यास अर्ज बाद केला जाईल.
- अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची अॅप्टीट्यूड टेस्ट घेतली जाते.
- अॅप्टीट्यूड टेस्ट पास झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
- मुलाखतीसाठी बोलावलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि इतर कागदपत्रे ऑनलाईन मागवून त्याची तपासणी केली जाते.
- मुलाखत झाल्यानंतर स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाते.
क्युमिन्स स्कॉलरशिप अंतर्गत कोणता खर्च मिळतो?
कॉलेजची अॅडमिशन फी, ट्युशन फी या स्कॉलरशिप अंतर्गत कव्हर होते.
कोणते खर्च या स्कॉलरशिप अंतर्गत येत नाहीत?
प्रायव्हेट ट्युशन्स, राहण्या-खाण्याचा खर्च, ट्रान्सपोर्टचा खर्च, कॉलेजमध्ये भरलेली रिफंडेबल फी आदी खर्च स्कॉलरशीपमधून दिले जात नाहीत.