Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top Scholarship after 10th in India: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी या आहेत बेस्ट स्कॉलरशिप

Scholarship

Top Scholarship after 10th in India: दहावीचा निकाल लागला असून आता विद्यार्थ्यांची 11 वी प्रवेशासाठी लगबग सुरु आहे. करियरची दिशा ठरवण्यासाठी 10 वी नंतर पुढील उच्च माध्यमिक शिक्षण कोणत्या विषयात करणार हे महत्वाचे असते. इयत्ता 10 वी चांगले मार्क काढलेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून आणि काही खासगी संस्थांकडून स्कॉलरशिप दिली जाते.

दहावीचा निकाल लागला असून आता विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरु आहे. करियरची दिशा ठरवण्यासाठी 10 वी नंतर पुढील उच्च माध्यमिक शिक्षण कोणत्या विषयात करणार हे महत्वाचे असते. इयत्ता 10 वी चांगले मार्क काढलेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून आणि काही खासगी संस्थांकडून स्कॉलरशिप दिली जाते.यात आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपमध्ये प्राधान्य दिले जाते.

इंडियन ऑइल अ‍ॅकेडमिक स्कॉलरशिप (Indian Oil Academic Scholarship)

इंडियन ऑइल अ‍ॅकेडेमिक स्कॉलरशिपमध्ये विविध श्रेणीतील 10 च्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते .ही राष्ट्रीय पातळीवरील स्कॉलरशिप योजना आहे. देशभरातील 2000 हून अधिक विद्यार्थ्यांना दरमहा 1000 रुपयांची स्कॉलरशिप 2 वर्ष कालावधीसाठी मिळते. या स्कॉलरशिपसाठी इयत्ता 10 वीमध्ये सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्याला किमान 65% आणि एससी, एसटी  विद्यार्थ्यांना 60% आणि दिव्यांग विद्यार्थ्याला किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करु शकता.

अखिल भारतीय गुणवंत स्कॉलरशिप (All India Meritorious Scholarship)

अखिल भारतीय गुणवंत स्कॉलरशिपमध्ये 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. 11 वी आणि 12 वीमधील विद्यार्थी सुद्धा या स्कॉलरशिपसाठी अर्ज करु शकतात. यासाठी 249 रुपये शुल्क भरावे लागते.या स्कॉलरशिपमध्ये दोन प्रकारचे प्रोग्रॅम आहेत. एक गुणांनुसार स्कॉलरशिप दिली जाते. तर दुसऱ्या प्रकारात गुण आणि विद्यार्थ्याची गरज या दोन्हींचा विचार करुन स्कॉलरशिप दिली जाते. स्कॉलरशिप प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्याला पूर्व परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागते.

सरस्वती अ‍ॅकेडमी स्कॉलरशिप

सरस्वती अ‍ॅकेडमी स्कॉलरशिप योजनेत 10 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करते. त्याचबरोबर 10 मधील विद्यार्थी देखील या स्कॉलरशिपसाठी अर्ज करु शकतात.या योजनेत दहावीचे गुण आणि सरस्वती अ‍ॅकेडमी स्कॉलरशिप प्रोग्रॅममधील गुण यानुसार मेरिट ठरवली जाते. शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाच्या किमान 30% ते 100% रक्कम स्कॉलरशिपमधून दिली जाते.सरस्वती अ‍ॅकेडमी स्कॉलरशिप प्रोग्रॅम रॅंक मिळवण्यास अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना किमान 15000 रुपयांची स्कॉलरशिप मिळते.

विद्याधन स्कॉलरशिप

सरोजिनी दामोदर फाउंडेशनकडून आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. या स्कॉलरशिपसाठी पूर्व परीक्षा आणि मुलाखत अशी प्रोसेस आहे. ही यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 वर्षांसाठी स्कॉलरशिप दिली जाते. 2 वर्षात विद्यार्थ्याने चांगले गुण मिळवले तर पुढे पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी देखील स्कॉलरशिप दिली जाते.सध्या या योजनेत महराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते.

शिक्षा अभियान स्कॉलरशिप

मोदी फाउंडेशनकडून शिक्षा अभियान स्कॉलरशिप दिली जाते. ज्यात विद्यार्थ्यांना ट्यूशन फीसाठी अर्थसहाय्य केले जाते. विद्यार्थ्यांना योग्यतेनुसार 5% ते 100% पर्यंत स्कॉलरशिप दिली जाते. इयत्ता 8 वी ते 12 पर्यंतचे विद्यार्थी अर्ज करु शकतात.  या स्कॉलरशिपसाठी पूर्व परीक्षा आणि मुलाखत अशी प्रोसेस आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश या राज्यातील विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी अर्ज करु शकतात.

एनसीईआरटी स्कॉलरशिप

दहावीतील गुणवंत  विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी एनसीईआरटी स्कॉलरशिप दिली जाते. या स्कॉलरशिपसाठी दोन टप्प्यात विद्यार्थ्यांची निवड केली जाते. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतो.