TATA AIG Scholarship 2023: टाटा-एआयजी कंपनीच्या सीएसआर स्कीम अंतर्गत TATA AIG-Avanti Fellow ही स्कॉलरशिप राबवली जाते. 2020 पासून ही स्कॉलरशीप योजना सुरू करण्यात आली आहे. या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, त्याचे फायदे, पात्रता अशी संपूर्ण माहिती जाणून घ्या.
आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील मुलींना ही स्कॉलरशीप दिली जाते. विशेषकरून इंजिनिअरिंग आणि मेडिकल फिल्डमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींनी हिचा लाभ दिला जातो. शिष्यवृत्ती अंतर्गत निवड झालेल्या गुणवान विद्यार्थीनींना सर्व प्रकारची मदत पुरवली जाते. यामध्ये आर्थिक सहाय्यापासून, विषयानुसार तज्ज्ञांचे आणि करिअर मार्गदर्शन दिले जाते. जेणेकरून या विद्यार्थीनींनी करिअर म्हणून निवडलेल्या क्षेत्रातील सर्व कौशल्ये, ज्ञान आणि आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण व्हावा.
TATA AIG Scholarshipची ठळक वैशिष्ट्ये
टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि अवंती फेलोज यांच्यावतीने Tata AIG Avanti Fellows Scholarship योजना राबवली जाते. ही शिष्यवृत्ती फक्त मुलींसाठी आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट, 2023 आहे. इच्छुक विद्यार्थिनी इथून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
TATA AIG Scholarship पात्रता
- अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅण्ड, ओडिशा,पंजाब, सिक्कीम, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश या राज्यातील मुली या स्कॉलरशीपसाठी अर्ज करू शकतात.
- या मुलींनी जवाहर नवोदय विद्यालयमधून बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- या मुली पुढीलपैकी एका प्रवर्गात मोडणाऱ्या असाव्यात. SC / ST / GEN-EWS / PwD
- तसेच त्यांनी जेईई मेन्स किंवा नीटची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- त्यांनी भारतातील टॉप 200 मधील इंजिनिअरिंग आणि सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
अर्ज आणि निवड प्रक्रिया
TATA AIG Scholarship साठी प्रत्येक उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख 31 ऑगस्ट, 2023 आहे. रजिस्टेशननंतर अर्जाची छाननी करून त्यातून काही अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील. शॉर्टलिस्ट केलेल्या अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलावून त्यांची अंतिम यादी केली जाते. त्यानंतर स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थीनींची यादी प्रसिद्ध केली जाते.