Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

International scholarships : परदेशात शिक्षण घ्यायचंय? कोणकोणत्या शिष्यवृत्ती आहेत? जाणून घ्या...

International scholarships : परदेशात शिक्षण घ्यायचंय? कोणकोणत्या शिष्यवृत्ती आहेत? जाणून घ्या...

International scholarships : परदेशात शिक्षण घ्यायचं आहे, मात्र शिष्यवृत्तीबद्दल माहिती नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती सरकार, संस्था तसंच विशिष्ट विद्यापीठांमार्फत दिली जात असते. त्यासाठीचे निकषदेखील आहेत.

भारतातल्या अनेक विद्यार्थ्यांना परदेशात (Abroad) शिक्षण घेण्याची इच्छा असते. मिळणाऱ्या संधीची ते वाट पाहत असतात. अशा गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध विद्यापीठं (Universities) तसंच सरकारमार्फत ही शिष्यवृत्ती मिळवता येईल. निधीचा प्रकार, अभ्यासाचं स्थान म्हणजेच देश यानुसा विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. प्रामुख्यानं अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, यूके, आशिया अशा विविध प्रदेशातल्या शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. त्यातल्या काही शिष्यवृत्तींची माहिती आम्ही आपल्याला देत आहोत. टॉप युनिव्हर्सिटीजच्या (topuniversities.com) संकेतस्थळावर याविषयीची अधिक माहिती उपलब्ध आहे.

कुठेही अभ्यास करण्यासाठी

इनलॅक्स शिवदासानी फाउंडेशन शिष्यवृत्ती - भारतीय विद्यार्थ्यांना उत्तर अमेरिका किंवा युरोपमध्ये परदेशात शिकण्यासाठीची ही शिष्यवृत्ती आहे. अर्जदार 30 वर्षांखालील असावा (अर्ज करतेवेळी). भारतात वास्तव्यास असावा. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासासाठी ही शिष्यवृत्ती आहे. इतर निर्बंध लागू असतील.

आशियामध्ये अभ्यास करण्यासाठी

ऐची स्कॉलरशीप प्रोग्राम फॉर एशियन स्टूडंट्स इन जपान - जपानमधल्या ऐची प्रीफेक्चरल सरकारमान्य उत्पादन कार्यक्रमांमध्ये पदवी स्तरावर शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे.

डीएसटी ए स्टार स्कॉलरशीप - विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सिंगापूरमध्ये पदवीपूर्व, पदव्युत्तर, पदवी स्तरावरच्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तींची एक श्रेणी.

हिनरिच फाउंडेशन स्कॉलरशीप - हिनरिच फाऊंडेशनचे उद्दिष्ट शाश्वत जागतिक व्यापार वाढवणं आहे. महाद्वीपच्या समृद्धी सुधारण्यासाठी संपूर्ण आशियातल्या विविध ठिकाणी अभ्यास करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.

प्रो. एमेरिटस मदन मोहन दास मेमोरियल स्कॉलरशिप - भारतीय विद्यार्थ्यांना एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथल्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर डिग्री प्रोग्रामसाठी चार सेमिस्टरसाठी नोंदणी शुल्क आणि 24 क्रेडिट्स या स्कॉलरशीपद्वारे मिळू शकतात.

ऑस्ट्रेलियामध्ये अभ्यास करण्यासाठी

अ‍ॅडलेड युनिव्हर्सिटी अशोक खुराना स्कॉलरशीप फॉर इंडियन स्टुडेण्ट्स - अ‍ॅडलेड विद्यापीठात निवडलेल्या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड स्कूल ऑफ केमिस्ट्री अँड मॉलिक्युलर बायोसायन्सेस इंडियन स्कॉलरशिप - स्कूल ऑफ केमिस्ट्री अँड मॉलिक्युलर बायोसायन्सेसमध्ये पदव्युत्तर पदवी करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के शिक्षण शुल्क, विद्यार्थी सेवा आणि सुविधा शुल्कासहित ही शिष्यवृत्ती मिळते. 

युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स (यूएनएसडब्ल्यू सिडनी) फ्यूचर ऑफ चेंज इंडिया स्कॉलरशिप - भारतीय नागरिकासाठी ही शिष्यवृत्ती आहे. ज्याला यूएनएसडब्ल्यू सिडनी याठिकाणी पदवीपूर्व किंवा पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करण्यासाठी स्वीकारण्यात आलंय, त्याला ती दिली जाते. तुमच्या अर्जाचा एक भाग म्हणून तुम्हाला शिष्यवृत्ती तुमचे ध्येय गाठण्यात कशी मदत करेल, यावर चर्चा करणारा एक छोटा व्हिडिओ सबमिट करणं गरजेच आहे.

युरोपमध्ये अभ्यास करण्यासाठी  

आयर्लंड - यूसीडी ग्लोबल ग्रॅज्युएट स्कॉलरशीप फॉर इंडियन स्टुडेण्ट्स इन आयर्लंड - आयर्लंडमधील युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन इथं पदवीधर स्तरावर भारतीय विद्यार्थ्यांसाठी फंडिंगची संधी.

नेदरलँड - ऑरेंज ट्यूलिप स्कॉलरशीप - भारतीय विद्यार्थ्यांना नेदरलँड्समध्ये निवडक सहभागी विद्यापीठांमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर शिक्षण घेण्यासाठी या माध्यमातून अनुदान उपलब्ध आहे.

फ्रान्स - कॅम्पस फ्रान्स चारपाक शिष्यवृत्ती - भारतीय नागरिकांसाठी फ्रान्समध्ये पदव्युत्तर स्तरावर शिकण्यासाठीची ही शिष्यवृत्ती आहे. यासाठी वय 30 किंवा त्यापेक्षा कमी असावं. तुम्ही सध्याचे विद्यार्थी किंवा सध्या भारतात नोकरी केलेली असावी. पीएच्. डी. विद्यार्थ्यांसाठी फ्रेंच संस्थेत सहा महिन्यांपर्यंत संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी रमण चारपाक शिष्यवृत्तीदेखील उपलब्ध आहे.

यूके - ब्रिटिश कौन्सिल ग्रेट स्कॉलरशीप फॉर इंडियन स्टुडेण्ट्स - यूकेमध्ये शिक्षण घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलद्वारे या शिष्यवृत्तीची निवड केली जाते.

चार्ल्स वॉलेस इंडिया ट्रस्ट शिष्यवृत्ती - यूकेमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. डॉक्टरेट, संशोधन विद्यार्थी आणि भेट देणार्‍या फेलोसाठी ही खुली आहे.

हेरियट वॅट इंटरनॅशनल स्टुडण्ट्स स्कॉलरशीप - सप्टेंबर किंवा जानेवारीमध्ये नोंदणी करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी ही खुली आहे. 500,000 युरोपेक्षा जास्त शिष्यवृत्ती 1,500 युरो फी कमी म्हणून दिली जाईल.

एलएसई कॉमनवेल्थ शेअर्ड स्कॉलरशिप स्कीम (CSSS) - लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) इथं पदव्युत्तर स्तरावर अभ्यास करण्यासाठी कॉमनवेल्थ देशांमधल्या (भारतासह) आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पाच पुरस्कार उपलब्ध आहेत.

मिस. अगाथा हॅरिसन मेमोरियल फेलोशिप अ‍ॅट सेंट अँटोनीज कॉलेड - ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट अँटोनी कॉलेजमध्ये इतिहास, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात अभ्यास करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भारत सरकारतर्फे ही फेलोशिप ऑफर केली जाते. केवळ उच्च-प्राप्त पदव्युत्तर संशोधन विद्यार्थ्यांसाठीच ती उपलब्ध आहे.

ऑक्सफर्ड अँड केंब्रिज सोसायटी ऑफ इंडिया (OCSI) स्कॉलरशीप - ऑक्सफर्ड विद्यापीठ किंवा यूकेमधल्या केंब्रिज विद्यापीठात अभ्यास करण्यासाठी कोणत्याही पदवी स्तरावरच्या भारतीय विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. 

सॉल्टायर स्कॉलरशीप - कॅनडा, अमेरिका, भारत आणि चीनमधील विद्यार्थ्यांसाठी स्कॉटलंडमध्ये कोणत्याही पदवी स्तरावर अभ्यास करण्यासाठीची ही शिष्यवृत्ती आहे.

ससेक्स इंडिया स्कॉलरशीप - पदव्युत्तर पदवी स्तरावरच्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी यूकेमधल्या ससेक्स विद्यापीठात निधी मिळविण्याची यामार्फत संधी आहे. 

युनिव्हर्सिटी ऑफ लिंकन इंडिया स्कॉलरशीप - शिष्यवृत्ती 5,000 युरो ट्यूशन फी कपातीच्या स्वरूपात देऊ केलेल्या उच्च-प्राप्त भारतीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड फेलिक्स स्कॉलरशीप फॉर इंडियन स्टुडेण्ट्स - ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी पदवी-स्तरावरची ही शिष्यवृत्ती आहे. 

युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्ड - चांगली शैक्षणिक क्षमता दर्शविणाऱ्या अंडरग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट भारतीय विद्यार्थ्यांसाठीची ही शिष्यवृत्ती आहे. 

युनिव्हर्सिटी ऑफ साउथम्टन स्कॉलरशीप फॉर इंडियन स्टुडेण्ट्स - नरोतम सेखसारिया फाऊंडेशन कर्ज शिष्यवृत्ती आणि ग्रेट स्कॉलरशिपसह भारतीय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध.

यूडब्लूई इंटरनॅशनल स्कॉलरशीप - यूकेमधल्या यूडब्लूई ब्रिस्टल युनिव्हर्सिटी भारतासह अनेक देशांतल्या विद्यार्थ्यांसाठी अंडरग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट ट्यूशन फी ही सवलत शिष्यवृत्ती देत आहे.

यूएसमध्ये अभ्यास करण्यासाठी

शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस - रामकृष्णन फॅमिली स्कॉलरशीप आणि अख्तरली एच. टोबॅकोवाला फेलोशिप या दोन्ही भारतीय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. पूर्णवेळ एमबीए शिकण्यासाठी ही उपलब्ध आहे.

कॉर्नेल युनिव्हर्सिटी टाटा स्कॉलरशीप – कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये अंडरग्रॅज्युएट प्रोग्रामचा अभ्यास करण्यासाठी स्वीकारलेल्या भारतीय नागरिकांसाठी ही शिष्यवृत्ती आहे.

फुलब्राइट-नेहरू रिसर्च फेलोशिप्स - मान्यताप्राप्त यूएस संस्थेमध्ये कोणत्याही स्तरावर अभ्यास करू इच्छिणाऱ्या उत्कृष्ट भारतीय विद्यार्थ्यांना फंड ऑफर केला जातो. 

स्टॅनफोर्ड रिलायन्स धीरूभाई फेलोशिप्स फॉर इंडियन स्टुडेण्ट्स – भारतीय विद्यार्थ्यांना स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस इथे एमबीए प्रोग्राम शिकण्यासाठीची ही शिष्यवृत्ती आहे. पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांच्या आत भारतात परतणं गरजेचं आहे.

यासह विविध शिष्यवृत्ती अभ्यासक्रम आणि इतर निकषांच्या आधारे मिळू शकते. त्यामुळे जागतिक स्तरावर कुठेही शिक्षण घ्यायचं असेल तर या शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये आपण बसतो का, याचा विचार करून विद्यार्थ्यांनी तसा अर्ज करावा.