आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. अशा घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून एचडीएफसी या बँकेने परिवर्तन ही शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. HDFC बँकेकडून ECSS (Educational Crisis Scholarship Support) या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून परिवर्ताना कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या परिवर्तना कार्यक्रमाच्या माध्यमातून एचडीएफसी बँकेकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि, गुणंवत आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीचे स्वरुप, पात्रता निकष काय आहेत हे जाणून घेऊया..
Table of contents [Show]
75 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती-
HDFC बँकेच्या वतीने सामाजिक जबाबदारी म्हणून समाजातील वंचित, आर्थिकदृष्ट्या मागास आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परिवर्तन शिष्यवृत्ती दिली जाते.या शिष्यवृत् योजनेतंर्गत बँकेकडून 75000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामध्ये इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या शालेय विद्यार्सह डिप्लोमा, आयटीआय, पॉलिटेक्निक,चे शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतच्या शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.
शालेय आणि डिप्लोमा, आयटीआय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती -
एचडीएफसीकडून पहिली ते सहावीत शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यासाठी 15 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तर सातवी ते 12 वी आणि आयटीआय, डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना 18 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्याने किमान 55% मार्क घेऊन उतीर्ण होणे गरजेचे आहे.
पदवी शिक्षणसाठी शिष्यवृत्ती
परिवर्तन शिष्यवृत्ती योजनेतून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा महाविद्यालयाती अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे गरजेचे आहे. यामध्ये बीकॉम, बीएससी, बीए, बीसीए या अभ्यासक्रमासाठी 30,000 रुपये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये बीटेक, एमबीबीएस, एलएलबी, बी आर्क, नर्सिंग यासाठी 50000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृ्तीसाठी विद्यार्थ्याने मागील इयत्तेमध्ये 55% गुणांनी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृ्त्ती-
या शिष्यवृत्ती योजनेतंर्गत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण अभ्यासक्रमासाठी 35 हजार आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 75000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृ्तीसाठी विद्यार्थ्याने मागील वर्षामध्ये 55% गुणांनी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
पात्रता आणि निकष
एचडीएफसी बँकेच्या परिवर्तन शिष्यवृत्ती योजनाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांने मागील परीक्षेत 55% गुणांनी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.तसेच त्याच्या कुटंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. तसेच अर्जदार विद्यार्थी हा मागील तीन वर्षात ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक, वैयक्तिक अथवा कौटुबिक समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्यामुळे शिक्षणाचा खर्च करणे अडचणी आहे, अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची प्रक्रिया
2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृ्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एचडीएफसी बँकेच्या https://www.hdfcbankecss.com/ या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मूदत 30 सप्टेंबर 2023 आहे. अर्ज करताना विद्यार्थ्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- 2022-23 मध्ये उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड/मतदान कार्ड
- चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याचे प्रमाण
- बँक पासबूक
- उत्पन्नाचा दाखला