Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Corporate Scholarships: कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्कॉलरशीपसाठी कसे अप्लाय कराल? अॅडमिशन फी, होस्टेल खर्चाची चिंता होईल दूर

Corporate Scholarships

काही मुलामुलींना गुणवत्ता असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. आर्थिक अडचणींमुळे तडजोड किंवा शिक्षण अर्ध्यात सोडून देण्याची वेळ येते. मात्र, अशा अनेक कॉर्पोरेट कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या शिष्यवृत्ती योजना असतात ज्याद्वारे तुम्हाला आर्थिक मदत मिळते. नवे शैक्षणिक वर्ष अद्याप सुरू झाले नाही त्यामुळे अशा स्कॉलरशीप योजनांची माहिती घ्या.

Corporate Scholarships schemes: भारतामध्ये हजारो कॉर्पोरेट कंपन्या आहेत. त्यांच्याद्वारे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, पर्यावरण, जीवनावश्यक गरजा यासह अनेक गोष्टींसाठी आर्थिक आणि इतर मार्गांनी कॉर्पोरेट कंपन्यांकडून मदत करण्यात येते. कॉर्पोरेट कंपन्या शिक्षण क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात.

शालेय विद्यार्थी ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. CSR फंडाअंतर्गत कंपन्या स्वयंसेवी संस्थांमार्फत स्कॉलरशीप योजना राबवतात. (How to apply for Corporate Scholarships) तर काही कॉर्पोरेट कंपन्यांची स्वत:ची स्वयंसेवी संस्था असते त्याद्वारे स्कॉलरशीप दिली जाते. अनेक विद्यार्थ्यांना या स्कॉलरशीप योजनांना कसे अप्लाय करायचे, प्रक्रिया काय याबाबत माहिती नसते. त्यामुळे गरजू विद्यार्थी स्कॉलरशीपला मूकतात.

प्रत्येक कॉर्पोरेट कंपनी, स्वयंसेवी संस्था किंवा फाउंडेशनची स्कॉलरशीप मिळण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया पहावी किंवा संस्थेशी संपर्क करून माहिती घ्यावी. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या मुले आणि मुलींसाठी वेगवेगळ्या योजना असतात. मात्र, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी सहसा अनेक योजना असतात. 

पाहूया काही कॉर्पोरेट कंपन्यांच्या शिष्यवृत्ती योजना

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड स्कॉलरशीप (Bharat Heavy Electricals Limited -BHEL)   

या भारत सरकारच्या कंपनीद्वारे विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप दिले जाते. त्यासाठी कंपनीने FAEA या फाउंडेशनची स्थापना केली आहे. येथे तुम्हाला विविध स्कॉलरशीप योजना आणि अप्लाय करण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती मिळेल. 2023 साठीची स्कॉलरशीप प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम तारीख तुम्ही पाहू शकता.

पदवी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप योजना (अर्ज करण्याची अंतिम मुदत 30.06.2023)

पात्रता

विद्यार्थी मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी परीक्षा पास झालेला असावा
पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत असावा किंवा 12 नंतर पुढील शिक्षणासाठी पात्र 
ज्या विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल लागला नाही ते निकालानंतर अप्लाय करू शकतात. 
आर्थिकदृष्या मागास आणि कमकुवत गटातील विद्यार्थी अप्लाय करू शकतात.      

स्कॉलरशीपमधून मिळणारे फायदे

याद्वारे विद्यार्थ्याला पदवी शिक्षणाचे शुल्क, होस्टेल- मेस, पुस्तके, प्रवास, इतर खर्च मिळतो. प्रत्येक कोर्सनुसार ही रक्कम बदलू शकते. विद्यार्थी पदवी शिक्षणात चांगले गुण संपादन करत असेल तर स्कॉलरशीप पुढील वर्षीही मिळू शकते. स्कॉलरशीपचे नियम आणि अटी तुम्हाला या लिंकवर मिळतील. 

आदित्य बिर्ला स्कॉलरशीप (Aditya Birla Scholarship)

आदित्य बिर्ला कंपनीद्वारे विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप दिली जाते. इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. आयआयएम, आयआयटीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशीपचा लाभ मिळू शकतो. शैक्षणिक शुल्क, होस्टेल- मेस फी मिळेल. जास्तीत जास्त 3 लाखांपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते. नियम आणि अटी पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

सिमेन्स स्कॉलरशीप प्रोग्राम (Siemens Scholarship Program)

सिमेन्स कॉर्पोरेट कंपनीकडूनही विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप योजना राबवली जाते. सरकारी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. महाविद्यालयाचे शुल्क, होस्टेल, मेस, पुस्तके, अतिरिक्त क्लासेस साठी आर्थिक मदत मिळते. या स्कॉलरशीपसाठीच्या 50% जागा मुलींसाठी राखीव आहेत. पहिल्या श्रेणीत (फर्स्ट क्लास) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यापुढी वर्षासाठी पुन्हा स्कॉलरशीप मिळू शकते ही अट आहे. म्हणजेच विद्यार्थ्याला सर्व विषयांत पास व्हावे लागेल. या स्कॉलरशीपबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.