Usage Based Insurance: विमा हा तुमच्या वाहनाला कव्हरेज(Coverage) देण्यासाठी काम करतो. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास या विमा(Insurance) योजनेतून त्याची भरपाई करता येते. मात्र सध्या महागाई वाढल्याने विमा योजनाही महाग झाल्या आहेत. जर तुम्ही जास्त प्रीमियममुळे(Premium) तुमच्या वाहनाचा विमा काढू शकत नसाल, तर तुम्हाला युसेज बेस्ड इन्शुरन्स (UBI) बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्याप्रमाणात एखादी गोष्ट खर्च करता त्यानुसार तुम्ही बिल भरता अशाच प्रकारे ही युसेज बेस्ड इन्शुरन्स तयार करण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही तुमचे वाहन(Vehicle) जितके जास्त वापरता तितके जास्त प्रीमियम तुम्हाला यामध्ये भरावे लागणार आहेत. आहे की नाही विशेष. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
Pay as You Drive म्हणजे काय?
महागाईच्या काळात लोकांच्या समस्या लक्षात घेऊन सर्व विमा कंपन्या वापरावर आधारित विमा योजना ऑफर(Insurance Scheme Offer) करत आहेत. ही वाहन इन्शुरन्सवर उपलब्ध असलेली अॅड-ऑन कव्हर योजना(Add On Cover Scheme) आहे. जी नियमित वाहन विम्यासोबत घेतली जाऊ शकते. या योजनेमध्ये तुमच्या वाहनाच्या वापराच्या आधारावर प्रीमियम ठरवता येऊ शकतो. UBI प्लॅनचा वापर बाहेरील देशांमध्ये बऱ्याच वर्षांपासून केला जात आहे. परंतु भारतीय लोकांसाठी ही योजना नवीन आहे. या योजनेला 'Pay as You Drive' योजना असेही म्हटले जाते.
खिश्यावरील भार कमी करणारी योजना
ज्या लोकांकडे वाहन आहे परंतु ते फक्त अधूनमधून त्याचा वापर करतात म्हणजेच नियमित वापरत नाही. अशा लोकांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरू शकते. UIB अंतर्गत तुम्ही जेवढा वापर करता तेवढेच प्रीमियम(Premium) तुम्हाला द्यावे लागतात. अशा प्रकारच्या विम्यामुळे तुमच्या खिश्यावरील भार कमी होण्यास मदत होते.
दोन प्रकारे घेऊ शकता फायदा
पे ऍज यू ड्राइव (PAYD)
या प्लॅनमध्ये आतापर्यंत फिरलेले किलोमीटर(KM) आणि वाहनाच्या कालावधीनुसार प्रीमियम ठरवण्यात येतो. यासाठी विमाकर्ता किलोमीटर आणि कालावधीचा मागोवा घेण्यासाठी टेलिमॅटिक्सकडून मिळालेला डेटाचा वापर करतो.
पे हाऊ यू ड्राईव्ह (PHYD)
तुम्ही वाहन कसे चालवता याच्या आधारावर प्रीमियम ठरविला जातो. जर तुमचे ड्रायव्हिंग कौशल्य(Driving Skill) चांगले असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यामध्ये विमा कंपनी तुमच्या ड्रायव्हिंगच्या सवयी, इंजिनची स्थिती, वाहनाचा वेग इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी टेलिमॅटिक्स आणि जीपीएसचा वापर करते. त्या आधारावर चालकाला मार्क्स दिले जातात आणि त्या मार्क्सच्या आधारावर प्रीमियम ठरवला जातो.